Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras समाजातला शेवटचा घटक हाच केंद्रबिंदू माना - हिवरकर पाटील


महादरबार न्यूज नेटवर्क - 
शिवसेनेच्या भांबुर्डी ओबीसी शाखा उद्घाटन प्रसंगी राजकुमार हिवरकर पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख ओबीसी व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुकाप्रमुख शंकर वाघमोडे, माळशिरस तालुका मीडिया प्रमुख फरीद शेख, नातेपुते शहर प्रमुख रवी दादा वाघमारे, प्रभाग १३ चे प्रमुख राजू शेख, दहीगाव शाखाप्रमुख दत्ता बोडरे, मनोजजी वेदपाठक त्याचबरोबर भांबुर्डी  शाखेचे सर्व नेते पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना हिवरकर पाटील म्हणाले एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलेलं काम  महाराष्ट्राला विसरता येणार नाही लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील विद्यार्थ्यांसाठीच्या योजना असतील जेष्ठ नागरिकांसाठी पर्यटनवारी योजना असेल मारी सशक्ति करण्यासाठी बचत गटासाठी केलेले सर्व मोठे निर्णय असतील  शेतीपूरक उद्योगांसाठी चे  बाबतीतले निर्णय असतील. कामगारांच्या बाबतीतली निर्णय असतील महाराष्ट्रात झालेली परकीय गुंतवणूक असेल या सर्वांच्या चेहऱ्यावर फक्त एकनाथ शिंदे नावाचं हास्य दिसून येतं पक्ष आणि संघटना मजबूत करत असताना आपणाला समाजातला शेवटचा घटक आणि त्या घटकाला आपण मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे दुर्लक्षित राहिलेला लहान लहान समाज आहेत ते आपल्या सोबत जोडून पक्ष बळकट करण्याची जबाबदारी सर्व नेते पदाधिकाऱ्यांची आहे त्यांची काम आहेत कुणाचे आरोग्याचे काम आहे ऑपरेशन असतील. तहसील मधले काही दाखले असतील शेतकऱ्यांच्या सातबारा व इतर अडचणी असतील संजय गांधी निराधार योजना असेल  यांच्या हक्काची शिवसेना झाली पाहिजे मग ती सर्व लोक शिवसेनेच्या हक्काचे होतील ह्यातं शंका नाही. राज्यात पूरस्थिती चालू असल्याच्या कारणांना सोलापूर जिल्ह्यातील बारावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना बोर्डच्या फॉर्म ची सर्व कागदपत्र
भिजली तिचा आवाज एबीपी माझा ने संवेदनशील उपमुख्यमंत्री मा ना. एकनाथराव शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवला शिंदे साहेबांनी  तात्काळ आदेश शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना  देत पूर्ण महाराष्ट्रातील बारावीच्या बोर्डची फॉर्म भरण्याची मुदत वाढवून देणारा संवेदनशील नेता फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत बघतो करतो विचारून तपासून सांगतो हा पॅटर्न कधी शिंदे साहेबांनी ठेवला नाही आणि आपण आपला जो पक्ष सोलापूर जिल्ह्यात वाढतोय ते फक्त आणि फक्त शिंदे साहेबांनी केलेलं काम लोकांना झालेली मदत आणि त्या मदतीची परतफेड करण्यासाठी वेगवेगळ्या जाती-धर्माची वेगवेगळ्या गावातील मायबाप जनता पक्षासोबत शाखेच्या निमित्ताने माध्यमातून जोडली जात आहेत. शिंदे साहेबांनी केलेल्या कामांमुळे लोकांना अडचण आल्यावर फक्त एकनाथ शिंदे साहेब  शिवसेना हक्काची वाटते.

यावेळी  पदाधिकारी हरिभाऊ कचेॅ  (शाखाप्रमुख)
भाऊ साहेब देवकाते (उपशाखाप्रमुख),नितीन सरगर (शहरप्रमुख)
आजिनाथ वाघमोडे (उपशहरप्रमुख),आशोक ढेंबरे (संघटक)
संतोष शिंदे  (समन्वयक),वसंत सुर्यवंशी (पंचायतसमिती गण प्रमुख),आबासाहेब बगाडे (उप गन प्रमुख ),शिवाजी वाघमोडे
नीतन सुतार,जयसिंग वाघमोडे,साहील मगर,अंकुश वाघमोडे
केतन लवटे पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments