Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun पुनर्वसित गावांच्या प्रश्नांवर मुंबईत महत्त्वाची बैठक

आमदार शेखर निकम यांनी चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील पुनर्वसित गावांचे प्रश्न मांडले


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

पुनर्वसित गावांमधील विविध प्रश्नांबाबत मा. पुनर्वसन मंत्री श्री. मकरंद जाधव (पाटील) यांच्या दालनात, त्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली. यावेळी या बैठकीत आमदार शेखर निकम*यांनी चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील पुनर्वसित गावांच्या समस्या व नागरिकांच्या मागण्या मुद्देसूदपणे मांडल्या.

अतिवृष्टी, दरड कोसळणे आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे सुरक्षित व कायमस्वरूपी पुनर्वसन तसेच पुनर्वसित गावांमध्ये आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी तिवरे, पेढे - कुंभारवाडी,गोवळकोट-कदमवाडी, बौद्धवाडी-कोळकेवाडी तसेच कोंढ्रण (संगमेश्वर) येथील पुनर्वसित नागरिकांच्या प्रश्नांची चर्चा झाली. बाधित नागरिकांना केवळ स्थलांतरित न करता त्यांचे सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची गरज आमदार निकम यांनी मांडली.

पुनर्वसित नागरिकांसाठी सध्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणारे ₹२ लाख १० हजार रुपयांचे अनुदान आहे ते अनुदान वाढवून मिळणेबाबत तसेच सध्या ५०० चौ.फुटांची जागा मिळत आहे ती जागा वाढवून मिळणेबाबत धोरणात्मक निर्णय शासनाने घ्यावा.अशी आग्रही मागणी आमदार शेखर निकम यांनी मंत्री महोदय यांचेकडे केली यावर मंत्री महोदयांनी सकारात्मकता दाखवली.

या निर्णयामुळे पुनर्वसित कुटुंबांना अधिक चांगल्या व प्रशस्त घरांची सुविधा मिळण्यास मदत होईल.

पुनर्वसित गावांमधील नागरी सुविधा आणि इतर प्रलंबित कामांना गती देण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले साहेब, मंत्री महोदय भरतशेठ गोगावले साहेब, आमदार मनोज घोरपडे, आमदार शंकर मांडेकर, पुनर्वसन विभागाचे सचिव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments