Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplunआमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कोकरे जिल्हा परिषद गटातील फुरूस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

१९७ लाभार्थ्यांना विविध आरोग्यसेवांचा लाभ


आमदार शेखर निकम यांची सदिच्छा भेट : शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन

सभापती सूर्यकांत खेतले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार जयंती जनसेवा सप्ताह निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र फुरूस व भ. क. ल. वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि जन आरोग्य समिती फुरूस यांच्या सहकार्याने सोमवार (दि. २७) रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र फुरूस येथे आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण १९७ लाभार्थ्यांना विविध आरोग्यसेवांचा लाभ देण्यात आला.

महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती चिपळूणचे सभापती मा. श्री. सूर्यकांत खेतले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती मा. श्री. पांडूशेठ माळी, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. संजय कदम, पंचायत समिती सदस्या मा. श्रीमती मनस्वी बैकर, तालुका आरोग्य अधिकारी मा. श्रीमती ज्योती यादव, वैद्यकीय अधिकारी मा. श्रीमती सानिया सय्यद, सरपंच मा. श्री. शांताराम कदम, मा. श्रीमती दुर्वा विचारे, मा. श्री. नितीन सावंत, मा. श्री. पंकज साळवी, माजी सरपंच श्री. प्रकाश कदम, श्री. सचिन चव्हाण, श्री. विष्णू वाडेकर तसेच उपसरपंच श्री. सचिन खर्डे, श्री. दत्ता गुजर, श्री. रवींद्र साळुंखे जन आरोग्य समिती सदस्य डॉ. श्रीमती वर्षा खानविलकर, श्री. सतीश घाग, श्री. जगदीश कांबळे, श्री. सुधीर राजेशिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मा. श्री. शेखर निकम यांनी शिबिरास सदिच्छा भेट देत विविध विभागांची पाहणी केली तसेच लाभार्थी, तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्यासाठी अशा महाआरोग्य शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. आजारांचे वेळेत निदान व योग्य उपचार हे निरोगी समाजाचे आधारस्तंभ असून शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व यंत्रणा, वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व जन आरोग्य समितीचे त्यांनी अभिनंदन केले.

तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. विष्णू सकपाळ, बंड्या कदम, शिवदास कदम, प्रसाद कदम, संजय कदम, दीपक शिर्के, अरुण अधटराव, प्रकाश गुरव, प्रकाश कदम, अशोक चव्हाण, रणवीर मोरे, नीलेश खापरे, समीर चौगले, सुधीर सावर्डेकर, रवींद्र धूमक व साहिल भंडारी उपस्थित होते.

भ. क. ल. वालावलकर रुग्णालय, डेरवण येथील स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, त्वचारोग, अस्थिरोग, जनरल मेडिसिन व फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून मार्गदर्शन केले.

शिबिरामध्ये गरोदर माता तपासणी, प्रीपॅप टेस्ट, ब्लड बाय केमिस्ट्री टेस्ट, हिम्मेडॉलॉजी टेस्ट, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, नेत्र तपासणी, फिजिओथेरपी, HPV/TD लसीकरण, मासिक पाळी व्यवस्थापन (सॅनिटरी पॅड वाटप), आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड, वय वंदन कार्ड, किरकोळ आजारांवरील उपचार, संशयित कुष्ठरोग व मोतीबिंदू तपासणी, NCD तपासणी, त्वचा विकार तपासणी तसेच बालकांची तपासणी अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, समुदाय आरोग्य अधिकारी, गटप्रवर्तक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, फार्मसिस्ट, कनिष्ठ सहाय्यक, लॅब टेक्निशियन, आशा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

0 Comments