महादरबार न्यूज नेटवर्क -
ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, मोरोची येथे मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना अजितदादा पवार यांच्या कार्याचा परिचय करून देत त्यांच्या नेतृत्वगुण, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि समाजकार्यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक जिलानी आतार सर, वरिष्ठ समन्वयक समीर पठाण सर तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनीही आदरपूर्वक अभिवादन करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दिपाली मोरे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
0 Comments