Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute चंद्रकांत घुगरदरे प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नातेपुते येथे गुणवंत विद्यार्थी सायकल वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क - 
अक्षय शिक्षण संस्था नातेपुते संचालित चंद्रकांत घुगरदरे प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे गुणवंत विद्यार्थ्यांना ५० सायकल वाटप करण्यात आले. उद्योजक सुरेश आबा पालवे माजी जिल्हा परिषद सदस्य सोलापूर यांनी विद्यार्थ्यांना सायकली दिल्या.

या प्रसंगी अक्षय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ आण्णा कवितके, सचिव दिलीप घुगरदरे, प्रशाला समितीचे सभापती हनुमंत धालपे, विश्वस्त महेश ठोंबरे, मामासाहेब पांढरे, डॉ. विठ्ठल कवितके, अतुल बावकर, अभिजीत घुगरदरे ,नंदकिशोर धालपे, अँड. शिवाजीराव पिसाळ जनरल सेक्रेटरी नातेपुते एज्युकेशन सोसायटी , महेश शेटे, गणेश उराडे, त्रिमूर्ती गुंडगे, रविंद्र ठोंबरे, प्रकाश पदमन, नितीन जठार, सुभाष कुचेकर, मोहित जाधव, वल्लभ शेठ व बहुसंख्येने पालक उपस्थित होते. 

गुणवंत विद्यार्थी हे समाजाचे भूषण असतात. गुणवंतांचा सन्मान होणे गरजेचे आहे. उद्योजक सुरेश पालवे यांनी मोठ्या मनाने विद्यार्थ्यांना सायकली दिल्या. त्या बद्दल सर्वांनी त्यांना धन्यवाद दिले. समारंभाचे सूत्रसंचालन सुखदेव वलेकर, पांडुरंग कुचेकर यांनी, ओंकार सादरीकरण अलका दीक्षित यांनी तर आभार प्रदर्शन प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्मिता आवळे यांनी केले. समारंभाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभाग शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments