"शिस्त ही यशाची गुरुकिल्ली, मेहनत ही विजयाची वाट आणि आत्मविश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जिंका किंवा शिका, पण कधीही हार मानू नका"- आमदार शेखर निकम
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमी व देवरुख तायक्वांदो क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो फाईट स्पर्धा २०२६ चे उद्घाटन देवरुख येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
या उद्घाटन समारंभास आमदार शेखर निकम, रवींद्रजी माने (माजी पालकमंत्री व राज्यमंत्री), माजी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहनजी बने, देवरुख नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, देवरुख पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्हे, उपसभापती प्रफुल्ल बाईत, स्मिता लाड, डेपो मॅनेजर मधाळे मॅडम, रूपाली कदम, यशवंत गोपाळ, प्रफुल्ल भुवड, दत्ता भस्मे, रामूशेठ पंदेरे, आदिती लोध, व्यंकटेश करारा, राजू वनकुद्रे, शशांक घडशी, अभिजीत शेट्ये, मोहन हजारे, बाळू शेठ ढवळे, बाळा पंदेरे, पंकज पुसाळकर, बंधू सुर्वे, आंबेकर मॅडम, पूर्वा पवार, उत्तम पवार, संदीप जागुष्टे, समीर राजवाडे, अकॅडमी व क्लबचे पदाधिकारी, प्रशिक्षक, पंच, पालक, खेळाडू, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सर्व उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंना शुभेच्छा देत, क्रीडासंस्कृतीचा विकास, शिस्त, मेहनत आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले.
उद्घाटनप्रसंगी आमदार शेखर निकम यांनी सांगितले की, "खेळ हा केवळ पदक जिंकण्याचा मार्ग नसून तो व्यक्तिमत्त्व घडविणारा संस्कार आहे. तायक्वांदोमुळे शिस्त, आत्मविश्वास, संयम आणि संकटांचा सामना करण्याची ताकद निर्माण होते. ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये मोठी क्षमता असून योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या बळावर ते राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितच यश मिळवू शकतात. प्रत्येक स्पर्धेकडे विजयाइतकाच अनुभव मिळवण्याची संधी म्हणून पाहा आणि क्रीडाभावना जपत सर्वोत्तम कामगिरी करा.
0 Comments