महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव वनाझ परिवार विद्यामंदिर येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आले. या खास दिवशी मराठी भाषेचे महत्व आणि समृद्धी प्रदर्शित करण्यासाठी अनेक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तयार केलेल्या "किमया लेखणीची "या हस्तलिखिताचे प्रकाशन शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. अनिता दारवटकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या हस्तलिखिताची संकल्पना शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका अनिताताई यांची होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध लेख, संवाद, म्हणी,निबंध,शब्दकोडे यांचे लेखन केले व मराठी भाषेविषयी आदराची भावना विद्यार्थ्यांनी साकारली. या कार्यक्रमांमध्ये स्वरचित कविता मराठी भाषेचे महत्व सांगणारे भाषण विद्यार्थ्यांनी सादर केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेल्या शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ अनिताताई यांनी या हस्तलिखिताबद्दल माहिती सांगितली व या हस्तलिखितास हातभार लावणाऱ्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक केले. या हस्तलिखित लिखिताचे आकर्षक असे मुखपृष्ठ शाळेतील शिक्षिका सौ आदिती देवरखकर व सौ.कविता कांबळे यांनी तयार केले. हस्तलिखिताची प्रस्तावना व मलपृष्ठ शिक्षिका संगीता चव्हाण यांनी तयार केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अक्षदा टेमघरे व मंगल ताई थरकुडे यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समिती प्रमुख सौ सुनिता जपे, सौ. मंदाकिनी लोहार, अश्विनी चव्हाण मंगल ताई थरकुडे यांनी केले होते.या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता दारवटकर व पर्यवेक्षिका सौ. माया झावरे, कांचन गोपाळे व विद्यालयातील इतर सर्व शिक्षक उपस्थित होते.
अशाप्रकारे माननीय मुख्याध्यापिका मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापिका ,पर्यवेक्षिका सांस्कृतिक समिती प्रमुख यांच्या नियोजनामध्ये शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सहकार्याने मराठी राजभाषा दिनाचा व हस्तलिखित प्रकाशनाचा कार्यक्रम उत्तम रित्या पार पडला.
0 Comments