#Natepute:रुग्णालयाच्या कॅम्पस मध्ये रुग्ण आला की आता मी बरा होईन असा विश्वास रुग्णाला वाटावा असे काम करा - शिवाजीराव सावंत


महादरबार न्यूज नेटवर्क  -     
ग्रामीण रुग्णालयाच्या कॅम्पस मध्ये रुग्ण आला की आता मी बरा होईन हा विश्वास वाटावा असे वर्तन आणि काम सर्वांनी करावे तुमच्याकडून रुग्णाला निम्मा धीर आला पाहिजे हा सर्व स्टाफ माझ्यासाठी काम करत आहे असे रुग्णाला वाटले पाहिजे आलेल्या पेशंटला आधार देण्याचे काम करा त्या पेशंटला आत्मविश्वास व आधार वाटला पाहिजे असे वागा  ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला चांगल्या सेवा देऊन  आरोग्यमंत्र्यांनी  रुग्ण सेवे बाबतचा केलेला संकल्प थडीस न्या असे प्रतिपादन बाळासाहेबांचे शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य  शिवाजीराव सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी नातेपुते ग्रामीण रुग्णालयात तत्काळ मंजुरी देऊन केलेल्या रक्ताच्या ऑटो तपासणी यंत्राच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या  वेळी केले.

पुढे बोलताना शिवाजी सावंत म्हणाले आरोग्य मंत्री यांनी पहिली भेट नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयाला देऊन मंत्री महोदयांनी सर्व रुग्णालय फिरून बघितले  होते. आरोग्य मंत्री यांची सवय आहे प्रत्येक गोष्ट चिकित्सक पद्धतीने बघायची आपल्याला जी शासनाने जबाबदारी दिली आहे  किंवा आपण स्वतःहून घेतले आहे ते काम तडीस न्यायचे व पूर्ण करायची हा त्यांचा पहिल्यापासून स्वभाव आहे सुरुवात नातेपुते पासून होते आरोग्य खात्यासारखे चांगले सेवाभावी खाते आपल्या वाटणीला आले आणि फार मोठे काम करण्याची संधी या आरोग्य खात्यामध्ये आहे सर्वच आरोग्य कर्मचारी डॉक्टर, नर्स, आशा वर्कर यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचे आरोग्य मंत्री प्रयत्न करीत आहेत. आरोग्य खाते कोविडच्या काळात प्रकटपणे सर्वांच्या पुढे आले नागरिकांचे आरोग्य चांगले सुदृढ राहण्यासाठी  ज्या काही सुख सोयी उपलब्ध पाहिजेत या गोष्टी सरकारी दवाखान्यात मिळाल्या  पाहिजे  चांगली सुधारणा झाली पाहिजे अत्यावश्यक असणारी तपासणारी सर्व यंत्रणा उपलब्ध असली पाहिजे या यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या योजनेतून सहा कोटी महिलांचे तपासणी झाली यासाठी आरोग्य खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम केले आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामाच्या प्रमाणात मानधन दिले जात नाही त्याविषयीही प्रस्ताव तयार केला आहे. तसेच नातेपुते ग्रामीण रुग्णालयासाठी  पूर्णवेळ अधीक्षक मिळण्यासाठी त्वरित शासनाकडे मागणी करणार आहे. लोकांना अन्न वस्त्र निवारा याबरोबर आरोग्याच्या सुविधाची ही गरज आहे.  नागरिकांच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणेबाबत ज्या काही अडचणी असतील त्या आरोग्यय मंत्री यांच्याकडून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले नागरिकांना प्रत्येक गोष्टीसाठी जिल्ह्याच्या अथवा दुसऱ्या शहराच्या ठिकाणी जावे लागू नये आपल्याला ज्या काही सोडवण्याचा आमच्याकडून प्रयत्न राहील  मी सुद्धा सामान्य माणूस असून तुमच्यासाठी भांडणारा तुमच्यासाठी काम करून घेणारा तसेच हे सरकार काम करणारे सरकार आहे माझ्याकडे कामासाठी येणाऱ्याला वसल्याची गरज लागणार नाही सरळ या मी माणसातला माणूस आहे माणूस म्हणून जगणे सर्वांसाठी काम करणे आपल्याला सेवा करण्यासाठी खुर्ची मिळाले आहे मालक होण्यासाठी नाही आत्तापर्यंत सर्वांची भावना ही आहे की मी निवडून आलो आमदार झालो मालक झालो असे वाटते आपणच त्यांना मालक करतो आणि विचारतो  तुमची जरा वेळ मिळेल का परंतु त्यांना ती खुर्ची काम करून घेण्यासाठी दिलेले असते ते एक माध्यम आहे प्रत्येकाने मालक न समजता सेवक समजावे या पद्धतीने काम करा निश्चितच बदल झाल्याशिवाय राहणार नाही आणि हल्लीच्या काळात हीच गरज आहे.


यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक धनंजय पाटील म्हणाले नातेपुते ग्रामीण रुग्णालयाला माझी पहिलीच भेट असून आरोग्य मंत्री यांची रुग्णाबद्दल असणारी तळमळ स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू माता सुरक्षित तर घर सुरक्षित सुरक्षित ही चळवळ जी उभी केली त्याचा दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन नातेपुतेतून  करत आहे दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी  त्यात आपण शंभर टक्के माता पर्यंत कसे पोहोचू त्या मातांचे सुदृढ आरोग्य जन्मणाऱ्या बाळाचे सुदृढ आरोग्य ही जी  जबाबदारी आहे आपण व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी व आरोग्यमंत्र्यांचे स्वप्न आहे माता मूर्ती व बाल मृत्यू हे आपल्या परिसरात होणार नाहीत याची काळजी घेऊ तसेच नातेपुते ग्रामीण रुग्णालयात औषधे कमी पडू देणार नाही आज लोक लोकार्पण केलेल्या तपासणी  मशीनचे गोरगरीब नागरिकांना फायदा होईल.


यावेळी माळशिरस तालुका प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला दौऱ्यात आरोग्य मंत्री माळशिरस तालुक्यात माझ्या प्रवेशाच्या वेळी आले असता नातेपुते ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन तेथील उनिवा लक्षात आल्या व आम्ही केलेल्या मागण्या त्वरित मान्य करून आज आरोग्यमंत्र्यामुळेच थोड्या अवधीत नातेपुते ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट दिसत आहे दवाखान्यातील ज्या अडचणी होत्या त्याच  लोकांकडून तेच काम चांगले करून घेतले असे चांगले काम झाले तर सामान्य माणसाचा सरकारी दवाखान्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल काम करीत असताना प्रत्येक ठिकाणी अडचण असते परंतु अडचण न सांगता काम करून अडचण दूर करून काम करण्याची भूमिका करायची असते  माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाला महाराष्ट्राने देशात पहिले पारितोषिक मिळवले राज्याचे सरकार तसेच आरोग्य मंत्री चांगले काम करीत आहेत जिल्हा संपर्कप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजीराव सावंत यांना कामासाठी कधीही फोन केला तरी ते त्वरित आमचे काम करीत असतात त्यांच्यामुळे आम्हाला काम करण्यास हुरूप व उत्साह  येत आहे राज्यातील सरकार माझ्यासाठी काम करत आहे असे सर्वसामान्यांना वाटले पाहिजे यासाठी आरोग्यमंत्र्यांची तळमळ आहे सर्वसामान्यतील लोकांपर्यंत आरोग्य मंत्री पोहोचत आहेत.

यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. धनंजय पाटील , माजी आरोग्य अधिकारी डॉ. एम.पी.मोरे , ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. नम्रता व्होरा, डॉ. गुडे, डॉ. सातव , तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील, तालुका उपप्रमुख सतीश सपकाळ, जि. प. माजी सदस्य बी. वाय. राऊत, दत्ता सावंत , महावीर देशमुख, दादा मुलाणी , पोपट शिंदे,  भैया चांगण तसेच नातेपुतेतील प्रायव्हेट दवाखान्यातील अनेक तज्ञ डॉक्टर आदि पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम