Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun सरंद येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन

२९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

 गोपाळकृष्ण भक्त मंडळ व ग्रामस्थ मंडळ, सरंद यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही दातार गणेश मंदिर, सरंद येथे श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव श्रावण कृष्ण प्रतिपदा, शनिवार दि. २९ ऑगस्ट २०२६ ते श्रावण कृष्ण नवमी, शनिवार दि. ०५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रंगणार आहे.

   या उत्सवादरम्यान दररोज महाआरती, मंत्रपुष्प व भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. ३० ऑगस्ट रोजी सत्यनारायण महापूजा व पागोरा भजन मंडळ (नायशी) यांचा कार्यक्रम रंगेल. १ सप्टेंबर रोजी महिलांसाठी हळदीकुंकू आणि श्री सिद्धेश्वर वरदान प्रासादिक भजन मंडळ (निवे बुद्रुक) यांचे भजन होईल. ३ सप्टेंबर रोजी हरिपाठ व विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

प्रमुख सोहळे व मिरवणूक :

• श्रीकृष्ण जन्मोत्सव : शुक्रवार दि. ०४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री देव गोपाळकृष्ण मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. रात्री १० वाजता बक्षीस वितरण, जन्मोत्सव सोहळा व पोथी वाचन पार पडेल.

• गोपाळाकाला व विसर्जन : शनिवार दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत गोविंदा गोपाळाकाला होईल. सायंकाळी ५ वाजता मूर्तीची सवाद्य विसर्जन मिरवणूक निघेल आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे आयोजन उत्सव अध्यक्ष संतोष बाळाराम गोटेकर आणि उत्सव सेक्रेटरी पुजा दयानंद भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. सर्व भाविकांनी सहकुटुंब व सहपरिवार उपस्थित राहून या उत्सवाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन गोपाळकृष्ण भक्त मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments