Hot Posts

6/recent/ticker-posts

#Akluj:सुरेशआबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप



महादरबार न्यूज नेटवर्क -
ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात 123 रक्तदात्यांनी रक्तदान केले.चाकोरे परिसरातील सर्वच जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या,पेन,शालेय साहित्य व खाऊ वाटप व शिक्षक दिनानिमित्त जि.प.शाळा,चक्रेश्वर माध्य. विद्यालयातील शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
   
यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमापूजन केले.शालेय विद्यार्थ्यांनी डॉ.राधाकृष्णन व शिक्षक दिनाविषयी भाषणे केली.जि.प.आदर्श प्राथ.शाळा व चाकोरे ग्रामस्थांतर्फे सुरेशआबा पाटील यांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष जयराम कुंभार,जिवन जानकर,विरेंद्र वाघमारे,चाकोरे गावातील विविध संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.जिवन जानकर,विरेंद्र वाघमारे,
सामाजिक कार्यकर्ते किरण भांगे,जयराम कुंभार इ.मनोगत व्यक्त केले.
          
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पठाण सर,राजगुरू सर,क्षीरसागर सर,सपकाळ मॅडम,गायकवाड मॅडम व चाकोरे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासो.शिंदे व सूत्रसंचालन तुकाराम वाघमोडे व एकनाथ कदम सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments