Posts

#Baramati चंदुकाका सराफ सुवर्णपेढीमध्ये साजरा केला पुरुष दिन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - चंदुकाका सराफ या १९८ वर्षांच्या शुद्ध सोन्यासाठी परंपरा जपणाऱ्या सुवर्णपेढीमध्ये पुरुष दिन साजरा करण्यात आला. बालदिन, ज्येष्ठ नागरिक दिन, महिला दिन आपण साजरा करतो मात्र पुरुष दिन बहुतांशी साजरा केला जात नाही. आयुष्यभर राब-राब राबणाऱ्या हातांना कुठेतरी थोडसं सुख मिळावं, कौतुक व्हावं, आणि आपल्या जीवनात प्रेरणा मिळावी हा उद्देश ठेवून चंदुकाका सराफ या सुवर्णपेढीने बारामती परिसरातील मुथा क्लासेसचे श्री रमेश मुथा, दातांचे प्रसिद्ध डॉक्टर अभिषेक घुले, प्रसिद्ध गायक सुरेश हिटे,उद्योजक मुनीर तांबोळी, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश नालंदे, माजी सैनिक दत्तात्रय हाके व आनंदराव शिंदे, ऑल केमिस्ट स्पोकन अकॅडमी चे प्रकाश पानसरे, आनंदा कर्चे, जेसीबी शोरूम चे मॅनेजर संजय पाटील व दादासाहेब देवकाते, उद्योजक राजू मेथा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना खास निमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. आपल्यातील नकारात्मक प्रतिमा दूर करून आपण सकारात्मकतेकडे कायम वाटचाल करत रहा व कसोटीने स्वच्छ चारित्र्याने आपण काम केल्यास समाजात न होते अशा पद्धतीचे मत प्

#Yavat बिबट्याच्या दहशतीखाली दौंडचा ग्रामीण भाग

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दि१८ नोव्हेंबर  रोजी अखिल भारतीय मराठा महासंघ दौंड तालुका यांच्या तर्फे वनविभाग कार्यालय दौंड  यांना  निवेदन देण्यात आले. दौंड तालुक्यामधील व परिसरामध्ये बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे परिसरातील जनता दहशतीखाली आली आहे, परिसरामध्ये बिबट्याच्या वावरा वाढल्या मुळे जनतेचे मोठ्या प्रमाणावरती आर्थिक व शारीरिक नुकसान होत आहे. यामध्ये नागरिकांच्या पशुधनाची हानी पण खूप मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत झालेले आहे, तसेच बिबट्याने कालच दौंड तालुक्यातील बोरीपारधी या ठिकाणी एका अडीच महिन्याच्या लहान मुलावरती हल्ला केला त्यात त्या बाळाला जीव गमवावा लागला याची दखल घेऊन नागरिकां मध्ये संतापाची लाट पसरत चालली आहे सर्व सामान्य लोकांनी  वन विभागाला जाब विचारण्यास सुरुवात केली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने लहान मुलांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालेला आहे, शाळेमध्ये जाणारी लहान मुले मोठ्या दहशतीमध्ये आहेत त्याचबरोबर शेतामध्ये जाणारे मजुरी करणारे शेतकरी व महिलावर्ग खूप मोठ्या दहशती खाली जगत आहे. या सर्व बाबींची कल्पना वारंवार वनविभागाला देऊनही कुठल्याही प्रका

#Chiplun धामापूर जिल्हा परिषद गटात 'रात्रीस खेळ चाले' नागरिकांना खुलेआम पैसे वाटपाची जोरदार चर्चा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघात निवडणुकीला जोर धरला आहे. आमदार शेखर निकम यांचे आपल्या मतदार संघावर असलेले प्रभुत्व व जनतेचे त्यांचेवर असलेले प्रेम व विश्वास यांमुळे त्याचा एकतर्फी विजय निश्चित दिसत आहे. खोटी आश्वासने, पैशाचे वाटप व आमदार शेखर निकम यांच्याबद्दल अपप्रचार करून विरोधक आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करित आहेत. धामापूर जिल्हा परिषद गटातील आरवली येथे रात्री ११.३० च्या सुमारास  कारसह काही व्यक्ती नागरिकांना जबरदस्तीने पैसे वाटप करित असल्याचे तेथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारायच्या आधी सदर वाहनातील एक व्यक्ती पैसे सदृष्य बॅगेसह   गाडीमध्ये बसून संगमेश्वरच्या दिशेने  चिपळूणच्या दिशेने पलायन केले. ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती तात्काळ आमदार शेखर निकम यांचे स्विय सहाय्यक अमित सुर्वे यांना दिली. विरोधकांना आपला पराभव दिसत असल्याने त्यांच्या समर्थकांकडून मतदार संघात नागरिकांना पैशाचे सुरु असलेले वाटप किती योग्य आहे? एकीकडे विकासाच्या वलगना करून विरोधक सरड्यापेक्षाही अधिक रंग बदलून जनतेची द

#Karunde लोंढे वस्ती येथे श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - लोंढे वस्ती, कारूंडे तालुका माळशिरस येथे राज्यस्तरीय जप प्रकल्प शिबिरास तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्रीराम मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यस्तरीय जप प्रकल्प शिबिरास तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नित्यनियम, आरती, दैनंदिन प्रवचन तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आप्पा पवार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. प्रवचन प्रभाकर मस्कर यांनी सांगितले. यावेळी नामप्रेमी नाम भक्त महिला पुरुष खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Chiplun चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ देवरुख येथे दक्षिण भाजप महिला मैदानात

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४  महायुतीचा विजय होण्यासाठी आणि चिपळूण संगमेश्वर विधानसभा महायुतीचे  उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारासाठी भाजपा महिला मोर्चा पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरल्या आहेत.                                                                      देवरुख शहर बागवाडी बूथ क्रमांक २९३ येथे महिला मोर्चा दक्षिण यांनी घरोघरी जाऊन प्रचारपरिपत्रके वाटून राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांच्या विजयासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी महिला पदाधिकाऱ्यांकडून महायुती सरकारचे महत्व भगिनींना सांगण्यात आले . या प्रचारासाठी माजी नगराध्यक्ष  मृणाल शेट्ये, शहर महिला आघाडी सेक्रेटरी गायत्री बने, जिल्हा उपाध्यक्षा भारती राजवाडे, नगरसेविका मनस्वी आंबेकर, जिल्हा सरचिटणीस स्वाती गोडे, जिल्हा उपाध्यक्षा शितल पंडित, वाॅर्ड अध्यक्ष रंजना नलावडे, श्रद्धा साडविलकर, भारती हेगशेट्ये, प्रशांती शेट्ये आदि पदाधिकारी व भाजपा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

#Kolhapur योगिता घुले यांची कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - यशवंत ब्रिगेडच्या कोल्हापूर महिला अध्यक्षा सौ. योगिता राजेंद्र घुले यांची कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सौ योगिता घुले यांनी यशवंत ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून धनगर समाजामध्ये सर्वसामान्य महिलांचे काम अगदी धडाडीने केलेले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज उर्फ बंटी पाटील आणि श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे विशेष प्रयत्नाने सौ योगिता घुले यांची कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्षापदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळुंखे यांनी दिले. निवडीनंतर योगिता घुले म्हणाल्या, यापुढे सर्वसामान्य महिलांसाठी सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा ध्यास आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांचे संघटन वाढवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. निवडीकामी जयसिंगपूरचे माजी नगरसेवक नितीन बागे, कोल्हापूर जिल्हा युवा काँग्रेस उपाध्यक्ष अमरसिंह कांबळे यांचे सहकार्य लाभले.

#Alandi आळंदीतील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा ; सुमारे दीड लाखाचा ऐवज असलेली बॅग, पत्ता शोधत केली परत

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - येथील ज्येष्ठ पत्रकार  व पार्ट टाइम व्यवसाय म्हणून  रिक्षा चालवणारे  महादेव पाखरे यांच्या रिक्षामध्ये काल ( सोम दि. ११ ) रात्री आठ वाजता  दोघे पती-पत्नी  आपल्या इच्छित स्थळी  जाण्यासाठी पाखरे यांच्या रिक्षामध्ये बसले असता, छोटासा प्रवास संपल्यानंतर  त्यांनी रिक्षामध्ये ठेवलेली  बॅग  त्यामध्ये असलेल्या किमती मौल्यवान वस्तू, ( त्यामध्ये दोन मनी मंगळसूत्र, बांगड्या, कानातील फुले)शालेय साहित्य व इतर ऐवज मिळून  सुमारे दीड लाखाचे दागिने सदरील बॅग मध्ये होते. परंतु ते घाई गडबडीत  रिक्षातून उतरताना  बॅग  विसरून गेले, ज्या ठिकाणी रिक्षा  गल्लीमधून फिरली  त्या ठिकाणची त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता, रात्र असल्याने रिक्षाचा नंबर त्यांना त्यामध्ये  दिसू शकला नाही, त्यामुळे पुढील हालचाली सदरील पती-पत्नीने  केल्या नाहीत,  मात्र रिक्षा चालक महादेव पाखरे यांना रात्री आपल्या रिक्षामध्ये कोणाची तरी बॅग विसरल्याचे निदर्शनास आले असता, सकाळी उठून पाखरे यांनी बॅग उघडली तर प्रथम त्यांना एमआयटी कॉलेज ( लोहगाव) या संस्थेतील आयडी  सापडला, त्यावरून  पाखरे यांनी कॉले