महादरबार न्यूज नेटवर्क -
येथील डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशालेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शरद डुमणे यांनी संविधानाबद्दल आपले विचार व्यक्त केले. त्यांनी भारतीय संविधानातील समता, न्याय आणि स्वातंत्र्याच्या तत्त्वांचे महत्व अधोरेखित करत तरुण पिढीने संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी प्रत्यक्ष जीवनात करावी, असे आवाहन केले. तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची सक्रिय सहभागिता अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक विनायक देशपांडे , उप प्राचार्य भारत पांढरे,उपमुख्याध्यापक नवनाथ बांगर,पर्यवेक्षक नीता मदने, संजय नाळे, संजय पवार, अभिजीत म्हामणे,विनोद काळे आदी मान्यवर तसेच विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम भोमाळे यांनी केले. सर्व विद्यार्थ्यांचे उपस्थितीत संविधानाचे वाचन करण्यात आले.
0 Comments