Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute चंदूकाका सराफ नातेपुते शाखेत संविधान दिन उत्साहात साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
चंदूकाका सराफ अँड सन्स ज्वेलर्सच्या नातेपुते शाखेत संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी शाखेमध्ये संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण  करून करण्यात आली. यावेळी शाखा व्यवस्थापक सुमय्या सय्यद, श्रेणीक दानोळे, प्रताप काझी, योगेश दाभाडे, अश्विनी टेके, सिंधू भुरे यांनी   उपस्थिताचे स्वागत केले.

यावेळी पोलीस कर्मचारी,पत्रकार, पोस्टातील कर्मचारी तसेच चंदूकाका सराफ येथील कर्मचारी उपस्थित होते. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार व कर्तव्यांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Post a Comment

0 Comments