महादरबार न्यूज नेटवर्क -
ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची ता. माळशिरस येथील इयत्ता ८ वी, ९ वी व १० वी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अनुभव घेण्यासाठी बारामती येथील हायटेक टेक्स्टाईल कंपनीची क्षेत्रभेट घेतली. विद्यार्थ्यांनी येथे सूत निर्मिती, वस्त्र विणकाम, रंग प्रक्रिया , फिनिशिंग व गुणवत्ता नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती मिळवली.अत्याधुनिक यंत्रसामग्री व संगणकीकृत नियंत्रण प्रणाली पाहून विद्यार्थी खूप प्रभावित झाले.
हायटेक टेक्स्टाईलच्या व्यवस्थापक व तज्ञांनी उत्पादन प्रक्रियांची सखोल माहिती देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी कंपनीतील स्वच्छता, सुरक्षितता आणि शिस्तबद्ध कामकाजाचे कौतुक केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षण आणि उद्योगातील वास्तव यांचा अनुभव लाभला. शैक्षणिक सहलीचे आयोजन मुख्याध्यापक . लक्ष्मण पाटील, उपमुख्याध्यापक जिलानी आतार व समीर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय निटवे व सचिव डॉ. योगिता निटवे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थी मार्गदर्शक सुरेखपवार, दीपक कुंभार, निलोफर शेख व गणेश खोमणे यांच्या सहकार्याने दौरा पूर्ण झाला.ही सहल विद्यार्थ्यांसाठी उद्योगविषयक ज्ञानाचा मौल्यवान स्रोत ठरली.
0 Comments