#Malshiras:माळशिरस नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा

दोन पती पत्नी नगरसेवक 

महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे

माळशिरस नगरपंचायत वर भारतीय जनता पार्टीचा दहा जागा मिळवून एकहत्ती सत्ता घेतली असून राष्ट्रवादीचे दोन , महाराष्ट्र विकास आघाडीचे दोन व अपक्ष तीन असे विजयी उमेदवार झालेले आहेत. 

माळशिरस नगरपंचायत भाजपकडून आप्पासाहेब देशमुख संजीवनी ताई पाटील मिलिंद कुलकर्णी यांच्या गटाच्या दहा जागा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुकाराम देशमुख गटाच्या दोन जागा महाराष्ट्र विकास आघाडी माणिकराव वाघमोडे गटाच्या दोन जागा व अपक्ष तीन जागा निवडून आल्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही.

यामध्ये राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख तुकाराम देशमुख यांचा पराभव झाला तर महाराष्ट्र विकास आघाडीचे माणिकराव वाघमोडे यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले तसेच भाजपच्या माजी नगराध्यक्षा लक्ष्मी सावंत यांचे चिरंजीव आकाश सावंत हे पराभूत झाले तसेच माजी नगराध्यक्ष लतादेवी सीद  यांचे दीर रामचंद्र सीद हेही पराभूत झाले आहेत तर माजी नगराध्यक्ष द्रुपदी देशमुख यांचे चिरंजीव विजय देशमुख हे विजयी झाले आहेत. माळशिरस भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना देशमुख व भाजपकडून आबा धाईंजे व त्यांच्या सुविद्य पत्नी शोभा धाईंजे  विजयी झालेले आहेत. 

विद्यमान नगरसेवक नूतन वाघमोडे व विद्यमान नगरसेवक नवनाथ वाघमोडे यांच्या पत्नी सुरेखा वाघमोडे या यावेळी पराभूत झाल्या. मागील निवडणुकीत सुरेश टेळे हे पराभूत झाले होते तर यावेळी त्यांच्या पत्नी रेश्मा टेळे या विजयी झालेल्या आहेत तर संतोष वाघमोडे यांनी मंगल गेजगे यांना निवडून आणून आपला गड राखला आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंगळवेढा प्रांत अधिकारी बाबासाहेब समिंदर तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माळशिरस जगदीश निंबाळकर यांनी काम पाहिले. कोणत्याही प्रकारचे अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून माळशिरस पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी चोख बंदोबस्त राखला होता. 

विजयी उमेदवारांनी माळशिरस  शहरात गुलाल व फटाक्याच्या अतिषबाजी करीत आनंद साजरा केला.

खालील विजयी उमेदवार व पडलेली मते दोन नंबर पराभूत उमेदवार व पडलेली मते 

प्रभाग १ - कैलास वामन  २४९ (म वि )आकाश सावंत २३० (भाजपा)

प्रभाग २- ताई वावरे बिनविरोध ( अपक्ष)

प्रभाग ३ - पूनम वळकुंदे  ४०७ (अपक्ष)सुरेखा वाघमोडे २३६ (भाजपा)

प्रभाग ४ - विजय देशमुख ४६४(भाजपा)तुकाराम देशमुख ३९२ ( राष्ट्रवादी)

प्रभाग ५ - शोभा धाईंज ३०२ (भाजपा) विकास धाईंज २७९ (राष्ट्रवादी)

प्रभाग ६ - आबा धाईंज ३६० (भाजपा) माणिक वाघमोडे ३२८ (म वि)

प्रभाग ७ - आप्पासाहेब देशमुख ३०७(भाजपा) सचिन टेळे २८०(राष्ट्रवादी)

प्रभाग ८ - कोमल जानकर ३०९(भाजपा) प्रियंका टेळे २२८ (राष्ट्रवादी)

प्रभाग ९ - राणी शिंदे ३४७(भाजपा) स्वाती शिंदे २४७(राष्ट्रवादी)

प्रभाग १० -अर्चना देशमुख ५९४ (भाजपा) सुप्रिया काळे २०६ ( राष्ट्रवादी)

प्रभाग ११ - रेश्मा टेळे ३३५ ( म वि) राणी देशमुख २७९ (राष्ट्रवादी )

प्रभाग १२ -प्राजक्त ओहोळ ३२४ (भाजपा) मंगल जमदाडे ३१५ ( राष्ट्रवादी)

प्रभाग १३ -शिवाजी देशमुख ५५३ (राष्ट्रवादी) नुतन वाघमोडे २४७ (भाजपा )

प्रभाग १४ - मंगल गेजगे ४५१(अपक्ष)रंजना धाईंजे ३२९ (राष्ट्रवादी )

प्रभाग १५- मंगल केमकर ५०८(भाजपा)पूजा पिसे २८४ (राष्ट्रवादी )

प्रभाग १६ - पुष्पावती कोळेकर ४६१(भाजपा)मनिषा वाघमोडे ३८०(अपक्ष)

प्रभाग १७ - रघुनाथ चव्हाण ३९६ (राष्ट्रवादी) रामचंद्र सीद ३२९(भाजपा)

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत