महादरबार न्यूज नेटवर्क - इस्लामपूर येथील सहशिक्षक संतोषकुमार हरी महामुनी यांची पुणे येथे विभागीय सुगम गायन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पंचायत समिती शिक्षण विभाग माळशिरस यांच्या वतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा २०२५ - २६ मध्ये सुगम गायन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा घेण्यात आली होती यामध्ये सहभागी सहशिक्षक संतोषकुमार महामुनी यांनी माळशिरस तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीच्या जोरावर त्यांची पुणे विभागीय सुगम गायन स्पर्धेसाठी निवड झाली. माळशिरस तालुक्यातील प्राथमिक विभागातील शिक्षकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तसेच सुगम वादन स्पर्धेतही संतोष महामुनी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
महामुनी सर यांच्या यशाबद्दल माळशिरस तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी मॅडम, केंद्राचे केंद्रप्रमुख हाके सर व केंद्रातील सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी महामुनी सरांचे अभिनंदन केले असून विभागीय सुगम गायन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या यशामध्ये उत्कृष्ट तबलावादक कदम सर, आत्माराम गायकवाड सर, गोडसे सर, कुंभार सर यांचे सहकार्य लाभले.
0 Comments