Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:धर्मपुरी ग्रामपंचायत उपसरपंच सौ. सुनिता भागोजी माने यांना सहीचे अधिकार

महादरबार न्यूज नेटवर्क - विवेक खरात

धर्मपुरी गावचे सरपंच अपात्र ठरल्यानंतर ग्रामपंचायत सहीचा अधिकार कोणाला की प्रशासक नेमणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

तसेच गावगाड्यात चर्चा सुरू होती की काहीही झाले तरी उपसरपंच यांना सहीचे अधिकार मिळणार नाहीत.

अखेर ग्रामपंचायत खाते चालवण्याबाबत पंचायत समिती माळशिरस गटविकास अधिकारी वर्ग १,  श्रीकांत खरात यांनी दिनांक- १७ जानेवारी २०२१  रोजी ग्रामपंचायत ठराव क्रमांक १९२ नुसार ग्रामपंचायत खाते चालविण्याचा अधिकार उपसरपंच सौ सुनिता भागोजी माने व ग्रामविकास अधिकारी विलास मोरे यांना दिले बाबत चे पत्र दिले आहे.

ग्रामपंचायत सहीचे चे अधिकार मिळण्यासाठी प्रदीप झेंडे, शहाजी मदने, नामदेव निटवे, नितीन निगडे, किरण पाटील, संतोष ठेंगील, गजानन पाटील, संजय झेंडे यांनी प्रयत्न केले .


गावातील उलट-सुलट चर्चा यांना पूर्णविराम मिळाला आहे. आमचा संविधानावरील विश्वास कायम आहे. आम्हाला न्याय संविधानामुळे मिळाला आहे.

 

प्रदीप झेंडे सामाजिक कार्यकर्ते

Post a Comment

0 Comments