Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun जनतेसाठी शब्द, विकासासाठी कृती - आमदार शेखर निकम

सुकाई देवी मंदिर रस्ता भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
देव दिवाळीच्या शुभमुहूर्तावर असुर्डे गावातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सुकाई देवी मंदिर रस्ता विकासकामाचे भूमिपूजन  आमदार  शेखर निकम यांच्या शुभहस्ते अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांना गैरसोय निर्माण करणारा २ किमी लांबीचा दुर्गम रस्ता आता सुरक्षित, सोयीस्कर आणि दर्जेदार रूपात विकसित होणार असल्याची माहिती आमदार साहेबांनी यावेळी दिली. या कामासाठी त्यांनी विविध विकास निधीतून ६० लाख रुपयांचा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध करून दिल्याचेही सांगितले. रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेगाने पूर्ण करण्याबाबत त्यांनी ठाम आश्वासन दिले.

कार्यक्रमाची सुरुवात गावच्या आराध्य दैवत सुकाई माता यांना नारळ वाढवून करण्यात आली. हा मान मां. कमलाकर गावकर यांना मिळाला. त्यानंतर विधिवत भूमिपूजन सोहळा पार पडला.

या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहनजी बने, जिल्हा परिषद गटाध्यक्ष संजयजी कदम, उपाध्यक्ष सुधीर राजे, पंचायत समिती गणाध्यक्ष नागेशजी साळवी, उपाध्यक्ष निलेश खापरे, सरपंच पंकज साळवी, उपसरपंच दिलीप जाधव, तसेच निर्मळवाडीतील अनंत निर्मळ, यशवंत निर्मळ, राजाराम निर्मळ, महादेव चोगले, प्रभाकर चोगले, गंगाराम चोगले, तानाजी चोगले, शिवाजी चोगले, समीर चोगले, अजित खापरे, शैलेश खापरे, मुंबई मंडळ अध्यक्ष संतोष चोगले, सचिव सूर्यकांत निर्मळ यांचा समावेश होता.

सोहळ्याला शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून या विकासकामाचे स्वागत केले आणि आमदार साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले. सुकाई देवी मंदिर रस्ता विकासाच्या प्रारंभामुळे असुर्डे परिसराचा संपर्कमार्ग सुधारेल, शेतीकामांना गती मिळेल आणि गावाच्या सर्वांगीण प्रगतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments