महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव चिपळुण नगरपरिषद निवडणूक २०२५ या निवडणुकीसाठी माझे मित्र श्री. विशाल विजया विलास राऊत चिन्ह घड्याळ हे प्रभाग क्र. १ (ब) मधून उमेदवार म्हणून उभे आहेत. सार्वजनिक क्षेत्रात ज्या पद्धतीने आपल्या चिपळूणचे आमदार श्री. शेखरजी निकम सर काम करत आहेत त्यांच्या त्या कामाच्या ख्यातीने आमदार साहेबांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच आमदार शेखर सरांनी निवडलेला हा उमेदवार खरोखरच लोकांच्या कामाचा माणूस गोवळकोटकरांच्या विकासासाठी हा माणूस स्वतःला झोकुन देईल. मी गोवळकोटच्या सर्व जनतेला आवाहन करतो, एकदा मत रुपी आशीर्वाद श्री. विशाल राऊत यांना द्यावेत आणि आपल्यातलाच आपला माणूस नगरपरिषदेवर पाठवावा. आमदार श्री. शेखर निकम सरांच्या शब्दाला आणि तुमच्या मत रुपी आशीर्वादाला माझे मित्र श्री. विशाल राऊत कधीही तडा जाऊ देणार नाहीत याची मला खात्री आहे.
लहानपणापासूनच समाज सेवेकडे ओढ
इतर मुलांप्रमाणे खेळणं, धावणं, मस्ती करणं हे सगळं होतंच… परंतु विशालच्या मनात मात्र लहानपणापासून एक गोष्ट घट्ट होती ती म्हणजे “आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहितरी देणं लागतो.” गोवळकोट गावात कुठे एखाद्या कुटुंबाला मदतीची गरज भासली, एखादा आजारी पडला, तातडीने रक्ताची गरज भासली, शाळेत मुलांना वह्या-पुस्तकांची अडचण निर्माण झाली शिवाय शेतकऱ्यांना जेव्हा जेव्हा गरज लागली तेव्हा विशाल राऊत मदतीसाठी पुढे धावताना दिसत होता . लोकांनी तेव्हा केवळ एकच वाक्य म्हटलं होतं-“हा मुलगा पुढे मोठं काम करणार.”
राजे सामाजिक प्रतिष्ठानची या संस्थेची स्थापना- एक दिशा
वय वाढत गेलं तसा विशालचा सेवाकार्याचा दृष्टीकोनही व्यापक होत गेला. समाजकार्यात सातत्य आणण्यासाठी त्यांनी गावातील मुलांना एकत्र घेऊन ‘राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट’ या संस्थेची स्थापना केली. प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले गोविंदगडावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली शिवाय गडसंवर्धनाचे काम सुरू झाले.
या प्रतिष्ठानच्या माध्यमातून— • शिक्षणासाठी साहित्य वितरण, • आरोग्य शिबिरे, • स्वच्छता अभियान, • रक्तदान शिबिर • गरजू कुटुंबांना मदत, • तरुणांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम…
अशा अनेक उपक्रमांची माळ गावात आणि परिसरात विणली गेली.
गोवळकोटचा ऐतिहासिक गोविंदगड किल्ला…काहींच्या स्मरणात, काहींच्या ऐकीवात होता.परंतु त्याचं प्रत्यक्ष महत्त्व, त्याची ऐतिहासिक परंपरा, त्याचं धाडसी वैभव…हे सगळं लोकांसमोर सुस्पष्टपणे आणणाऱ्यांमध्ये विशाल राऊत यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे.
आज गोविंदगडचा उल्लेख होताना लोक सहज म्हणतात— “हा किल्ला पुन्हा जिवंत केला तो प्रतिष्ठानच्या शिलेदार यांनीच.”
समाजाशी असलेलं नातं-
आज त्यांच्या कामाकडे पाहिलं की एक गोष्ट ठळक जाणवते, विशाल राऊत यांचं समाजाशी असलेलं नातं हे एखाद्या संस्थेचं किंवा पदाचं नसून ते एक भावनिक बांधीलकीचं नातं आहे.
जिवलग मित्राची दिलदार साथ विशाल यांनी आजवर केलेल्या निस्वार्थी सामाजिक कार्यात खांद्याला खांदा लावून त्यांचे हात बळकट करणारे जिवलग मित्र देखील आहेत. त्यात आघाडीवर एकच नाव आहे ते म्हणजे बंधू चव्हाण. बंधू चव्हाण यांनी विशाल यांची सावली बनून लक्ष्मणाप्रमाणे त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात तितकीच मोलाची मदत केली आहे.
गावातील जेष्ठ मंडळींपासून ते तरुणांपर्यंत,महिलांपासून ते शालेय विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक जण त्यांना आपलं मानतो आणि कदाचित म्हणूनच त्यांच्या नावाचा उच्चार होताना लोकांच्या चेहऱ्यावर एक विश्वास दिसतो.
समाजकार्यात अनेक जण येतात, काही दिवस काम करतात आणि निघून जातात…पण विशाल राऊत यांचं काम हे लाटेसारखं नाही ते नदीसारखं आहे… शांत, सातत्यपूर्ण आणि लोकांच्या आयुष्याला जीवनदायी स्पर्श देणारं.
0 Comments