#Natepute: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मनीषा जाधव यांचा सन्मान


महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र राज्याची शान राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या धर्मपुरी गावच्या आरोग्यसेविका मा. मनीषा जाधव मॅडम यांचा धर्मपुरी येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हासचिव, छावा ग्रुप सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. रविराज भैय्या बोत्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी माळशिरस तालुका तसेच सर्व सहकारी वर्गांनी सन्मान केला.

यावेळी त्यांच्या आरोग्यसेविका म्हणून कोरोना काळात असो किंवा या व्यतिरिक्त गेली १७ वर्ष झाले निस्वार्थ पणाने केलेल्या सेवेचे हे फळ आहे आणि अशीच सेवा कायम घडो असे रविराज भैय्यानी बोलत होते. आम्ही सर्वजनच नेहमी चांगल्या कार्यासाठी तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन ही दिले.
      
यावेळी सत्कार मूर्ती मा. मनीषा जाधव मॅडम यांनी सर्वांचे आभार मानत या मध्ये नकळत पणे तुम्हा सर्व गावकऱ्यांचा पण मोलाचा वाटा आहे असं म्हणत सर्वांचे  पुनश्च एकदा आभार व्यक्त केले.
       
यावेळी रविराजभैय्यांचे जवळचे मानले जाणारे सहकारी तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस माळशिरस तालुक्याचे उपाध्यक्ष  किरण करचे , गुरुमाऊली बहूउद्धेशिय सामाजिक संस्थेचे आणि गोशाळाचे अध्यक्ष सतीश निटवे ,राहुल रणदिवे , पै.महेश  करचे , रोशन शेडगे आणि मित्रपरिवार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम