Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras:माळशिरस तालुक्यातील नंदीवाले समाज्याच्या जातीच्या दाखल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार - आ रामभाऊ सातपुते


महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील  अनेक  गावात  नंदीवाले समाजातील लोक  राहतात. खरे तर हा समाज अतिशय  प्रतीकुल परिस्थिती  जगतो .जगण्यासाठी सतत  हया गावातुन त्या गावात कामधंदा  करण्यासाठी हे लोक सतत भटकंती  करतात .त्यांचा समावेश  खरेतर व्हि जे एनटी मध्ये  होतो पण भक्कम  शैक्षणिक  पुरावे नसल्यामुळे  हया लोकांचे ,विदयार्थनचे जातीचे दाखले  मिळत नाहीत यामुळे  या जमातीतील लोक शैक्षणीक सुविधापासुन वंचीत आहेत  तसेच  इतर शासकीय सुविधा  सुद्धा  मिळत नाहीत.

याविषयी  नुकतेच  कुसमोडचे माजी उपसरपंच संजय पाटील यांनी आमदार  रामभाऊ सातपुते  यांच्याकडे  या समाजबांधवांनची व्यथा मांडली यानंतर  आ रामभाऊ सातपुते  यांनी  येत्या  हिवाळी अधिवेशनात  मी नंदीवाले समाज्याच्या जातीच्या  दाखल्याचा प्रश्न  नक्की  मांडतो तसेच या समाज्याला आपण नक्कीच जातीचे दाखले  मिळवुन  देणार असल्याचे  त्यांनी  सांगितले. 

तर याविषयी कुसमोडच्या  माजी उपसरपंच  राणी पवार  यांनी आ रामभाऊ सातपुते  यांनी आमच्या  समाज्याचा  हा प्रश्न  सोडवुन समाज्याला प्रवाहात आणणयाचे काम करावे आणी ते नक्की  हे काम करतील अशी  मला  अपेक्षा  असल्याचे त्यांनी  सांगितले.  

Post a Comment

0 Comments