#Yavat:दौंड तालुक्यातील अविरत ३५ वर्ष गौरी गणपतीचे सेवा करणारे कचरे कुटुंबीय तर ग्रामीण संस्कृती जोपासणारे पवार कुटुंब


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील वरवंड येथील मा सरपंच संतोषकुमार कचरे हे गौरी गणपती ची अत्यंत सुरेख आरास करतात. श्री गणेशाचे आगमन झाल्यानंतर सर्वांच आतुरतेने ज्याची वाट पहातो त्या गौरी आवाहनाच्या तयारीची होत असते.पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी, देवी पार्वती कैलास पर्वतावरून पृथ्वीवर अवतरली अशी आख्यायिका आहे.शिवाय, काही भागात गौरी पूजनाला देवी लक्ष्मीच्या उपासनेचे रूप मानले जाते.


श्रीगणेशाप्रमाणेच माता गौरीची मूर्तीही मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात घरी आणली जाते.गौरी आवाहनाच्या दिवशी भाजी भाकरीचा नैवद्य दाखविला जातो.दुसऱ्या दिवशी पुरण पोळी चा नैवद्य दाखविला जातो.त्याच दिवशी महिला मोठ्या संख्येने  हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले..वरवंड येथील मा.सरपंच संतोषकुमार कचरे यांच्या परिवाराने मोठ्या थाटामाटात गौरी आवाहनाच्या नियोजन केले.गेली अविरत ३५ वर्षे कचरे परिवार गौरी आवाहनाचे नियोजन करत आहे.  हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या होत्या.सअश्रु नयनांनी सौ.महानंदा कचरे व सौ.सुरेखा कचरे यांनी निरोप दिला व पुढील वर्षी अशाच आनंदी वातावरणात स्वागत करण्याचा  मनोकामना व्यक्त केली.


राहू चे मनोज पवार हे पुण्यामध्ये असतात परंतू त्यांना गावाकडच्या पद्धतीच्या जसं की पुण्यामध्ये असताना त्याना गावाकडची ओढ लागते त्या पद्धतीमध्ये त्यांचे कुटुंबीय पुण्यामध्ये जुन्या पारंपारिक पद्धतीच्या गौरया आणि गणपती बसविले आहेत एका बाईला घरामध्ये काय काम असते तिला काय काम करावे लागते हे या देखाव्यामध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम