#Patas:नागेश्वर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी



महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालय व कै.मधुकरराव गंगाजीराव शितोळे उच्च माध्यमिक विद्यालय पाटस मध्ये युगप्रवर्तक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीच्या निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाहुण्याच्या हस्ते कर्मवीर आण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेषभुषा व आदिवासी वेषभुषा परिधान केल्या होत्या. 

तसेच लेझीम पथक,झांज पथक यांच्या मिरवणुकीमध्ये कसरती घेण्यात आल्या व त्याच बरोबर प्लॅस्टिक वापरावर बंदी घालावी यासंदर्भात उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. काही विद्यार्थ्यांनी वारकरी वेषभुषा करुन माऊली गित सादर केले त्याचबरोबर दांडिया मध्ये मुलींनी सहभाग घेतला होता.


खूप उत्साहात,कर्मवीरांच्या घोषणा देत मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीसाठी डीजे हितचिंतक नितीन पोळ यांनी तर ट्रॅक्टर  पांडुरंग जगताप यांनी मोफत दिले तसेच शाळेच्या व मंजिल महीला बचत गट यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.


या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक बी.आर.लोखंडे,पर्यवेक्षक एस.एस.भोसले, उपशिक्षक उत्तम रुपनवर,अतुल दिवेकर,अशोक ढोले,नितिन म्हस्के,पुनम भाट,पुनम वणवे व सर्व शिक्षकवृंद यांनी केले होते यावेळी संस्थेचे जनरल संचालक सदस्य नामदेव शितोळे,स्कुल कमिटी सदस्य योगेंद्र शितोळे, सिताराम भागवत,बाळासाहेब भागवत, सरपंच रंजनाताई पोळेकर, ग्रामपंचायत सदस्य माणिक चोरमले,छाया भागवत ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत