#Phaltan आता फलटणला मिळणार बारामतीचे शुद्ध सोने!!


महादरबार न्यूज नेटवर्क -
1827 पासून परंपरा, शुद्धता, विश्वास,पारदर्शकता,नाविन्यता, या पंचसूत्रांवर आधारित विश्वास संपादन केलेली व संपूर्ण महाराष्ट्रात 198 वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेली चंदुकाका सराफ ही सुवर्णपेढी आता आपल्या सेवेसाठी फलटणमध्ये येत असून या सुवर्णपेढीच्या शुभारंभाच्या सुवर्ण क्षणात आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि शुद्ध व कलात्मक दागिन्यांची शृंखला पहावी हे असे आग्रहाचे निमंत्रण चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा लि चे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी केले असून रविवार २८ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक शिंगणापूर रोड येथे सदरील भव्य दालनाचे उद्घाटन होणार आहे.

सदरील दालनाचे उद्घाटन मा श्रीमंत रामराजेनाईक निंबाळकर (महाराज साहेब ), मा श्री रणजीतसिंह नाईक निंबाळकर,मा.श्री आ.दीपक चव्हाण, मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मा श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, मा श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर, मा श्री दिलीप सिंह भोसले,मा सौ नीता मिलिंद नेवसे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

तसेच दिनांक २८ जुलै पासून एक ऑगस्टपर्यंत रोज एक जुपिटर बाईक जिंकण्याची सुवर्णसंधी देखील उपलब्ध असून यासाठी रुपये २०००० इतकी खरेदी होणे अपेक्षित आहे. तसेच रुपये ३००० च्या पुढील गुंतवणुकीवर देखील लकी ड्रॉ च्या माध्यमातून एक जुपिटर बाईक बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती या सुवर्णपेढीच्या संचालिका सौ. नेहा किशोरकुमार शहा यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम