#Chiplun चिपळूण मध्ये TWJ सूखायु क्लिनिक चे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
अनेक वर्ष TWJ च्या आरोग्य विभागाचे कार्य चिपळूण व गुहागर तालुक्यात खूप उत्तम प्रकारे सुरू आहे. दुर्गम भागात जाऊन आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांना सेवा देण्यात येते व ज्यांना काही अधिक सुविधांची गरज असते त्यांना योग्यरीत्या मार्गदर्शन करण्यात येते.


आता TWJ आरोग्य विभाग नवीन दिशेकडे वाटचाल करीत आहे.
आणि आज ह्याच TWJ's सुखायु क्लिनिक चे उद्घाटन आमदार श्री शेखर निकम  ह्याच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.आमदार शेखर निकम यांनी डॉ.शुभम कुशे व संपूर्ण कर्मचारी वर्गाला ला त्यांच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

ह्या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस जयंद्रतशेठ खताते
राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण शहर अध्यक्ष श्री मिलिंद शेठ कापडी,
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती यादव मॅडम तसेच अपरांत हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. यतीन जाधव सर, डॉ.पंकज कुलकर्णी, डॉ.नोमान अत्तार, Twj Ventures च्या डायरेक्टर सौ. माहेश्वरी पाटणे TSR चे डायरेक्टर प्रसन्न करंदीकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा शहराध्यक्ष सिद्धेश लाड, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सचिन साडविलकर, चिपळूणमधील युवा उद्योजक श्रीं. मुबीनभाई खोत, कल्पेश कोलते यांची ह्यावेळी उपस्थिती लाभली.

पाग, बायपास रोड ,देसाई बाजार समोर हे TWJ's सुखायु क्लिनिक सुरू झाले आहे.तरी नागरिकांनी ह्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम