#Natepute नातेपुते पोलिसांची दमदार कामगिरी चोरी करणाऱ्या महिलांना अर्ध्या तासात पकडले
महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत दिनांक२१/८/२०२४ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास महिला भामाबाई लक्ष्मण करचे वय ६५ वर्ष राहणार पिंपरी तालुका माळशिरस ह्या बस मध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले मंगळसूत्र किंमत ४०,००० हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले अशी माहिती कळतातच नातेपुते पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार , यांनी लागलीच बस स्टँड नातेपुते येथे जाऊन संशयित महिलांचा शोध घेऊन तिथून तीन महिला ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे तपास केला असता तेथील एक महिलेकडे चोरीस गेलेले ८ ग्रॅम वजनाचे डोरले मंगळसूत्र मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे.
सदर तीन महिलांची नावे पुढील प्रमाणे राधाबाई रामदास शिंदे , रुक्मिणी छगन भोसले दोघी राहणार अमळनेर तालुका पाटोदा जिल्हा बीड , विमल कुमार लोखंडे राहणार बारामती जिल्हा पुणे सध्या राहणार दहिगाव तालुका माळशिरस अशी असून त्यांचे विरुद्ध नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना गजाआड करण्यात आले तसेच इतरही गुन्हे केले असल्याचे शक्यता आहे.सदर गुण्याचा पुढील तपास पोहे का /संदेश पवार नातेपुते पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सो, मा,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर सो यांच्या सुचाना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पीएसआय दिघे, पोहेकाॅ संदेश पवार, राहुल ननवरे, पो.ना अमोल वाघमोडे, पोकाॅ सचिन कांबळे, अमोल देशमुख, असलम शेख, अमोल बंदुके, शिवानंद सोनवणे, आप्पा तोरणे,करचे व महिला पोकाॅ सारिका देशमुख यांनी केली असून एसटी परिसरात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे.
नातेपुते पोलीस स्टेशनच्या दमदार कामगिरीमुळे नागरिकांकडून नातेपुते पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment