#Mumbai किर्ती रात्र विद्यालय शिवडी येथे 'तिमिरातुनी तेजाकडे' यांच्या वतीने २९६ वे निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
किर्ती रात्र विद्यालय शिवडी प्रशालेत तिमिरातुनी तेजाकडे यांच्या वतीने बुधवार दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ७.०० वाजता स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय नोकरी व स्पर्धा परीक्षांचा विचार केला तर गरीब विद्यार्थी मागे पडतात याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव. सदर बाबीचा विचार करुन सन्माननीय श्री चंद्रकांतराव शिंदे अध्यक्ष प्रगती मंडळ मुंबई यांनी निःशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. प्रमुख मार्गदर्शक श्री सत्यवान यशवंत रेडकर सर (बीकॉम, एमकॉम, एमए(हिंदी), एमए (पब्लिक ऍडमिन), एलएलबी, पीजीडीएचआरएम, पीजीडीएलएल & आयएल, पीजीडीटी) कनिष्ठ अनुवाद अधिकारी सीमा शुल्क विभाग मुंबई, भारत सरकार ह्यांचे हे २९६ वे निःशुल्क मार्गदर्शन शिबिर होते.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा, स्पर्धा परीक्षांमध्ये यूपीएससी अंतर्गत कोणत्या शासकीय विभागात नोकरी मिळवता येते, केंद्र व राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये असणाऱ्या सेवा, सुविधा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आजची वास्तविक शिक्षण पद्धती शिकता शिकता स्पर्धा परीक्षा व आपले ध्येय समोर ठेवून अभ्यास करणे गरजेचे आहे. एमपीएससी अंतर्गत कोणत्या शासकीय नोकऱ्या उपलब्ध असतात, याविषयीही मार्गदर्शन केले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सरळ सेवा भरती कोणत्या पदासाठी असते, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा काय असते या बाबत ही माहिती दिली.
सदर मार्गदर्शन शिबिरास प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्री चंद्रकांतराव शिंदे, विश्वस्त, मुख्याध्यापक श्री. शिवाजी आव्हाड, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री गोरख इंगोले सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री सत्यविजय डांबरे सर यांनी केले.
किर्ती रात्र विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना बहुमूल्य निःशुल्क मार्गदर्शन केल्या बद्दल प्रगती मंडळ मुंबई यांनी श्री सत्यवान यशवंत रेडकर सर यांचे आभार व्यक्त केले.

Comments
Post a Comment