#Malshiras शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल - अजित बोरकर


महादरबार न्यूज नेटवर्क -
शासन राज्यातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असताना अवघ्या जगाचा पोशिंदा ,अन्नदाता शेतकरी मात्र सरकारच्या विविध योजनांपासून वंचितच आहे. यामुळे सातत्याने ओल्या व सुक्या दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांचे अश्रू सरकार कधी पुसणार ? वर्षानुवर्ष दारिद्र्यात राहणाऱ्या बळीराजाला न्याय कधी मिळणार ? या पार्श्वभूमीवर सरकारने अन्नदाता शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली सरकारला जाग आणण्यासाठी हलगी नाद आंदोलन करीत  शेतकऱ्यांच्या न्याय व हक्काच्या विविध मागण्यांचे निवेदन माळशिरस तहसीलदारांना दिले .सरकारला जाग आणून हलगीच्या निनादात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी,नायब तहसीलदार अमोल कदम यांना निवेदन देऊन माळशिरस चे तहसीलदार साहेब यांना शेतकरी प्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय न झाल्यास पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.


यावेळी संघटनेचे जेष्ठ नेते,मगन काळे,भिमराव फुले,शिवाजी चव्हाण,दत्ता भोसले, आप्पा चव्हाण,डॉ.सचिन शेंडगे,अजित बोरकर,उमेश भाकरे, गोपाळ घाडगे,अमरसिंह माने-देशमुख तात्यासाहेब काळे, उद्धव निंबाळकर,जब्बार आतार,मुकुंद काळे,दादासाहेब काळे,राजेश खरात, विकास काळे,आपा शिंदे, लक्ष्मण राचकर,भानुदास खरात,सचिन बोरकर सचिन मदने, शहाजी काळे,रसूल सय्यद,अभिजीत पाटील, श्रीमंत सावळकर, विजय वाघबंरे यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम