#Chiplun चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील उमेदवार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ खेर्डी, गोवळकोट येथे प्रचारसभा
राज्यात मुस्लिम समाजाला सर्वाधिक निधी देणारा आमदार म्हणजे शेखर निकम
मोहल्ल्यांमधून निकम यांना भरभरून मतदान करण्याचे आमदार नायकवडी यांचे आवाहन
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन जाणारा आमदार आहे. राज्यात सर्वाधिक निधी मुस्लिम समाजाला देणारा पहिला आमदार आहे. आपल्याला असा माणूस मिळणार नाही. समाजासाठी या माणसाचे योगदान आणि खंबीर पाठबळ आहे. त्यामुळे असाच माणूस आपल्याला, आपल्या समाजाला हवा आहे. त्यामुळे समाजबांधवामध्ये संभ्रम निर्माण करून मताची झोळी भरून घेणाऱ्या विरोधकांच्या अपप्रचारला बळी न पडता मुस्लिम बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणाऱया महायुती उमेदवार शेखर निकम यांना मोहल्ला- मोहल्ल्यातून भरभरून मतदान करा, असे आवाहन मुस्लिम समाजाचे नेते, आमदार इंद्रिस नायकवडी यांनी मंगळवारी येथे झालेल्या प्रचार सभांमध्ये केले.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, आमदार शेखर निकम यांच्या प्रचारार्थ मुस्लिम समाजाचे नेते, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे आमदार इंद्रिस नायकवडी हे मंगळवारी खास चिपळूण येथील मुस्लिम समाजाला भेटण्यासाठी आले होते. शहरालगताया खेर्डी तसा गोवळकोट येथे त्यांनी प्रचार सभा घेऊन शेखर निकम यांना निवडून देण्याचे आवाहन केले. त्याबरोबर अनेक मोहल्ल्यामध्ये जाऊन त्यानी अनेकांच्या गाठी-भेटी घेतल्या .
यानिमित्ताने आमदार नायकवडी यांच्या उपस्थितीत शहरातील बाजारपूल ते गोवळकोट धक्का अशी भव्य बाईक रॅली मिरवणूक काढण्यात आली. यानंतर झालेल्या प्रााारसभांमध्ये ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मुस्लिम समाजाचा वापर काँग्रेसने फक्त मतांसाठी केला आहे. समाजात संभ्रम निर्माण करायचा, मते मिळवायची आणि समजाला विसरून जायचे. पुन्हा निवडणुका आल्या की तसेच. आता या विरोधकांवर विश्वास ठेवू नका. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निधी हा चिपळूण येथील मुस्लिम समाजाला शेखर निकम यांनी दिला आहे. एवढा निधी कुठे दिला गेला नाही. ४२ कोटीचा निधी कधी मिळाला होता का? आम्हाला ही एवढा निधी आणणे शक्य झाले नाही. आपल्याला अजून विकासकामे करायी आहेत. त्यामुळे शेखर निकमच आमदार पाहिजेत. अजितदादा हे शब्दाचे पक्के आहेत. एकदा शब्द दिला की तो पाळला जातो. मुस्लिम समाजाच्या केसाला जरी धक्का लागला तरी सहन केला जाणार नाही, असा शब्द दादांनी दिला आहे. समाजाच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे आहेत.
यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन, इम्रान कोंडकरी, समीर काझी माजी नगराध्यक्षा रिहाना बिजले, माजी नगरसेवक करामत मिठागरी, मोहम्मद फकीर, कालुस्ते माजी सरपां अमीन परकार, बशीर फकीर, हारून घरे, जफर कटमाले, अब्दुल रौफ वांगडे, अखलाक मेयर, निसार निवरेकर, नवाब कटमाले, असगर नाखुदा, समीर पटेल, सर्पराज घारे, जमीर मुल्लाजी, शरीफ सुर्वे, कादिर परकार, वहाब सुर्वे, इम्रान खतीब, जहीर पुंडलिक, बरकत पाते, अमीन परकार, लतीफ पारकर, लियाकत कादरी, समीर चौगुले, इब्राहिम खान, खालिद उंडरे, भाऊ भाटकर, साजिद पारकर, इमाम शहा, रिझवान परकार, हनीफ दळवी, अशक हमदुले, रफिक अकबानी, फैसल मेमन, मुदस्सर चौगुले, सफदर खान, अमन कासकर, राहिल मणियार, शेहबाज कटमाले, फरहान तांबे, अमान अवेरी, खालीद दाभोळकर, सलीम पालोजी आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment