#Yavat:यवत येथील व्यापारी वर्गातून महाराष्ट्र बंदला प्रतिसाद


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबई येथील मोर्चानंतर सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर काढला होता. ‘सगेसोयरे’ असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. ती मागणी मान्य करण्यात आली. परंतु त्यावर अद्याप सरकारकडून कोणतीही ठोस अंमलबजावणी झाली नसल्याने मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे-पाटील यांनी दि १० पासून पुन्हा उपोषण सुरू केले. अंतरवाली सराटी येथे ते उपोषणास बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून शासनाने तातडीने विशेष बैठक बोलावून कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असून दि.१४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.

मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देणेसाठी सकल मराठा समाजाचे वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती यासाठी यवत येथील मराठा समाजबांधवांनी गाव बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत यवत मधील व्यापारी वर्गणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
महाराष्ट्र बंदला प्रतिसाद म्हणून, तालुक्यातील , पाटस,यवत, वरवंड, चौफुला, खुटबाव  भांडगाव आदी गावात सकल मराठा समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला.
सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दिलेल्या आश्वसनाची मागणी ताबडतोब पूर्ण करण्याची मागणी होत असून यासाठी यवत गावातील सर्व मराठा समाज बांधव, व्यापारी व दुकानदार यांनी एक दिवस आपली दुकाने बंद ठेऊन महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देऊन मराठा आरक्षणासाठी मनोज जरागे-पाटील यांना पाठिंबा दर्शवला.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम