Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute आर्थिक स्थिती भक्कम असल्याने शिक्षक पतसंस्था अग्रेसर- ॲड. शिवाजीराव पिसाळ

 २८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत पाल्य व आदर्श शिक्षकांचा सन्मान


महादरबार न्यूज नेटवर्क -

नातेपुते एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था गेल्या २८ वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे वाटचाल करीत असून, माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर पतसंस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे. सभासदांची आर्थिक शिस्त, संस्थेवरील विश्वास आणि संचालक मंडळाचे नियोजनबद्ध कामकाज यामुळे संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम राहिली आहे, असे प्रतिपादन नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे जनरल सेक्रेटरी ॲड. शिवाजीराव पिसाळ यांनी केले.


नातेपुते येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. पिसाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन आबासाहेब देवकाते होते.

शिक्षक समाजामध्ये चांगले नागरिक घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यामुळे शिक्षकांची पतसंस्थाही आर्थिकदृष्ट्या सक्षम व आदर्श असणे आवश्यक आहे. नातेपुते शहरात १५ टक्के लाभांश देणारी एकमेव पतसंस्था असल्याचे ॲड. पिसाळ यांनी सांगितले.

सभेत संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. ठेवी व कर्जवाटपात झालेली वाढ ही संस्थेच्या प्रगतीचे द्योतक असल्याचे नमूद करण्यात आले. अहवालाचे वाचन सचिव अभिजीत वाळके यांनी केले.

यावेळी पतसंस्थेच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

सभेस नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  बाहुबली चंकेश्वरा, व्हा. चेअरमन,संतोष काळे, सेक्रेटरी एडवोकेट शिवाजीराव पिसाळ, महेश शेटे, आबासाहेब देवकाते, अभिजीत वाळके, आप्पासाहेब निकम, नवनाथ बांगर, नीता मदने, संजय नाळे, सारिका जगताप, विनोद काळे यांच्यासह संचालक मंडळ, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सारिका जगताप यांनी केले, तर आभार विनोद काळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments