Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun कपिला पार्क अपार्टमेंट धामणवणे येथे आमदार शेखर निकम यांचा भव्य सत्कार


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
धामणवणे येथील कपिला पार्क अपार्टमेंटच्या रहिवाशांनी नव्याने निवडून आलेल्या आमदार शेखर निकम यांचा भव्य सत्कार करून त्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली.यावेळी आमदार शेखर निकम यांनी उपस्थितां सोबत संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या.

“तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे आश्वासन देत श्री.निकम यांनी रहिवाशांचा विश्वास जिंकला.त्यांनी परिसराच्या विकासासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले.
     
यावेळी अपार्टमेंटच्या रहिवाशांनी आपल्या भावना व्यक्त करत "आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू,"असे सांगून आमदारांच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला.या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.आपले आमदार जनसंपर्काच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा प्रत्यय या कार्यक्रमाने पुन्हा एकदा आला.

यावेळी परशुराम काटकर,दत्तात्रय जाधव,बाळकृष्ण गोवळकर,प्रमोद कदम,संदीप चिपळूणकर,प्रकाश राठोड,सचिन रेडीज,अतुल भोसले,परशुराम विरकर,बाबासाहेब जगताप,आशिष कोळपे,सुनील पवार,तानाजी एलके,सुप्रिया कदम,विनोद वरक,राष्ट्रवादी काँग्रेस चिपळूण तालुकाध्यक्ष नितीनजी(अबूशेठ)ठसाळे, शहराध्यक्ष मिंलिदशेठ कापडी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments