Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat लोकशाहीचा चौथा आधारस्तंभच धोक्यात - दशरथ यादव

प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ दौंड यांचा पत्रकार दिन साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
वृत्तपत्र क्षेत्रात सध्या पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहील की नाही अशी अवस्था निर्माण झाली असून, ढासळणारा लोकशाहीचा चौथा आधास्तंभ सावरण्यासाठी पत्रकारांना आता संघर्ष करावा लागणार आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक दशरथ यादव यांनी केले. दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने भुलेश्वर मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यादव म्हणाले, ''ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून, सत्ताधारी लोकांच्या हातातलं बाहुले बनली आहेत. डिजिटल मिडीयाच्या दबावामुळे तरी पत्रकारिता तगून राहील, एवढीच आशा राहिली आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आहे. आगरकर, आचार्य अत्रे यांची खरी पत्रकारिता पुन्हा जिवंत करावी लागेल, तरच पुन्हा लोकशाही उभी राहील. पत्रकारांची विश्वासार्हता कायम राहणे अत्यावश्यक आहे. पत्रकारांना सर्वत्र मान मिळतो मात्र धन मिळवण्यासाठी पत्रकारीतेच्या व्यतिरिक्त अन्य व्यवसाय करुन उत्पन्न मिळवण्याची धडपड करायला हवी.

दरम्यान सोमवारी ता.६ रोजी सकाळी भुलेश्वर मंदिर येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुजारी राजेंद्र गाडेकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप सोनवणे व जेष्ठ साहित्यिक दशरत यादव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी संजय सोनवणे, राहुल अवचट, विठ्ठल थोरात, दीपक पवार, आनंदा बारवकर, संतोष जगताप, मिलिंद शेंडगे, अतुल बोराटे, बाळासाहेब मुळीक, शशिकांत रासकर, नेताजी खराडे, अनिल गायकवाड, दत्तात्रय डाडर, संदीप चव्हाण, सुशांत जगताप, विलास कांबळे, करण गायकवाड, नितीन गव्हाणे, गौरव दिवेकर, विनायक यादव, धनाजी ताकवणे, संतोष शेंडे, बालाजी घोडके, सलीम मुलानी, डॉक्टर सकट, प्रकाश यादव, अरविंद जगताप, दादा गाडेकर, आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. पत्रकारासाठी भविष्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य पवन साळवे यांचे वडील गौतम साळवे यांचे नुकतेच निधन झाले त्यांना पत्रकार संघातर्फे आदरांजली वाहण्यात आली.

प्रास्ताविक अध्यक्ष संदीप सोनवणे यांनी तर आभार उपाध्यक्ष संदीप भालेराव यांनी मानले.

Post a Comment

0 Comments