महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते शहरातील पुणे पंढरपूर रोडवरील डीवायडरवर बसवण्यात आलेली स्ट्रीट लाईट पोल चालू करा यासाठी नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी यांना अण्णा सेनेमार्फत दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी निवेदन देण्यात आले होते कारण रोडच्या मध्यभागी डिव्हायडर वरील लाईट खांब बंद असल्यामुळे रोडवरून जाणाऱ्या वाहन चालकाला व पायी चालत जाणाऱ्यांना हा त्रास होत होता कारण मेन रोडवरील लाईट नसल्यामुळे पूर्णता रोडवर अंधार असल्यामुळे व लाईट बंद असल्यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता होती. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने लवकरात लवकर मेन रोडवरील लाईट चालू करण्यासाठी दिनांक १०.फेब्रुवारी२०२५. रोजी नातेपुते नगरपंचायत मुख्य अधिकारी यांच्या कार्यासमोर एकदिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात येणार होते. परंतु संबंधित मुख्याधिकारी साहेबांनी लवकरच आपले जनहितार्थ मागणीचे प्रश्न मार्गी लावू असे आम्हास पत्र देण्यात आले आणि सदर अण्णा सेनेच्या निवेदनाची दखल घेतली गेली व नातेपुते शहरातील पुणे पंढरपूर रोडवरील बसवण्यात आलेली ट्रीट लाईट चालू करण्यात आली. त्यामुळे गावातील नागरिकाकडून अण्णा सेना प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आणि भिंगारदिवे यांची नातेपुते ग्रामस्थ मध्ये संघटनेची चर्चा होत आहे.
0 Comments