Hot Posts

6/recent/ticker-posts

#Nateputeगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नातेपुते शहरात पोलिसांचा रूट मार्च

महादरबार न्यूज नेटवर्क -
आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी आज दिनांक 12/09/2026 रोजी सायं. 18:00 ते 18:50 वा. दरम्यान नातेपुते शहरात पोलिसांकडून रूट मार्च घेण्यात आला.

सदर रूट मार्चमध्ये नातेपुते शहरातील बाजारपेठ परिसर, दहिगाव चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिरळे चौक तसेच बस स्थानक परिसर या महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश करण्यात आला.

गणेशोत्सव कालावधीत नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखून उत्सव साजरा करावा, तसेच कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

सदर रूट मार्चमध्ये 01 पोलीस अधिकारी, 13 पोलीस अंमलदार व 21 होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments