Hot Posts

6/recent/ticker-posts

#Alandi ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते सुवर्ण कलशारोहण कृतज्ञता सोहळ्यामध्ये सन्मान


महादरबार न्यूज नेटवर्क -
श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण  कलशारोहन  नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत व ह .भ. प .डॉ. नारायण म. जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
त्या सुवर्ण कलशाकरिता देवस्थानने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने जमा झालेला सेवा निधी देवस्थानकडे जमा करण्यात आला होता. त्यानिमित्ताने ( रविवार दि. २४ ) देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचा सन्मान केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते व ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व देवस्थानचे सर्व विश्वस्त व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.  संस्थेच्या वतीने हा सन्मान संस्थेचे अध्यक्ष व आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष  सुरेश वडगावकर यांनी स्वीकारला.

Post a Comment

0 Comments