महादरबार न्यूज नेटवर्क -
शिवसेना नेते राजकुमार हिवरकर पाटील यांनी सोलापूर जिल्हा ओबीसी पदाची जबाबदारी घेतल्यापासून जिल्ह्यातील ओबीसी बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. यामुळे शिवसेना सोलापूर ओबीसी सेल मध्ये ओबीसी बांधव मोठ्या संख्येने प्रवेश करत आहेत.
शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या पक्ष्याचा कारभार हिंदुरुदय सम्राट बाळासाहेबांच्या व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचारधारेवर चालू आहे. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री काळातल्या केलेल्या कामामुळे महाराष्ट्रातील जनता प्रचंड समाधानीआहे. इतर पक्षा प्रमाणे ओबीसी समाज आपल्याही पक्षा सोबत राहिला पाहिजे त्यासाठी मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना ओबीसी विभागच स्वतंत्ररित्या चालू केला. त्यामुळे लहान लहान घटकाचे लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करीत असल्याचे दिसत आहे.
शिवसेना भवनावर शिवसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख ओबीसी राजकुमार हिवरकर पाटील यांच्या उपस्थिती त पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला यामध्ये बांगर्डे गावचे सरपंच भाऊ दडस, पळस मंडळ गावचे माजी सरपंच दत्तात्रय करे, सोसायटीचे चेअरमन नामदेव चव्हाण, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते गनीम भाई, मुबारक मुलानी, शिवाजीभाऊ कदम, सरपंच नाना दडस, लाला दडस, तानाजी खोमणे, बाळू मगर, हनुमंत दडस, समाज वाघमोडे, सागर खिलारे, शिवाजी दडस, माऊली करे, अजित केंगार, युवराज करे, पप्पू राऊत पाटील, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
यावेळी दादा मुलानी, विनोद बोराटे, पोपटराव शिंदे, संदेश बरडकर , राजू मुलानी, अक्षय सोरटे, विनोद शिंदे इ.उपस्थित होते.
0 Comments