महादरबार न्यूज नेटवर्क -
पर्यावरणपूरक विकास आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगार या दुहेरी उद्दिष्टांना साध्य करत श्री शरद बापू मोरे मोटार वाहतूक सहकारी संस्थे मध्ये दुध वाहतुकीसाठी आधुनिक इलेक्ट्रिकल गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.
शिवप्रसाद उद्योग समूह चे अध्यक्ष मा.श्री.शरद बापू मोरे यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम साकार झाला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे हे एक अभिनव पाऊल ठरत आहे.दुध वाहतुकीसाठी पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिकल गाड्यांचा वापर केल्यामुळे प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे.
पर्यावरण संरक्षणासोबतच इंधन खर्चात बचत, कमी देखभाल खर्च आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.या उपक्रमाअंतर्गत युवकांना प्राधान्य देत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. वाहनचालक, तांत्रिक सहाय्यक तसेच व्यवस्थापनाशी संबंधित विविध पदांवर स्थानिक युवकांची नियुक्ती करण्यात येत असून, त्यामुळे ग्रामीण भागात स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण होत आहे.
मा. शरद बापू मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणारा हा उपक्रम सहकार क्षेत्रात एक नवा मापदंड ठरत आहे.
“प्रदूषणमुक्त वाहतूक आणि स्थानिक युवकांना रोजगार” या दुहेरी ध्येयातून सामाजिक बांधिलकी जपत औद्योगिक प्रगती साधण्याचा प्रयत्न असल्याची भावना व्यक्त होत आहे.सहकार, पर्यावरण आणि रोजगारनिर्मिती या त्रिसूत्रीवर आधारित हा प्रकल्प भविष्यात राज्यातील इतर संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
0 Comments