#Mumbai:राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केली मेंढपाळाच्या वाड्यावर

एक लाख रुपये चा धनादेश देऊन अश्रू पुसण्याचा प्रयत्न

27 मेंढ्या ठार झालेल्या मेंढपाळांचा केला सन्मान

महादरबार न्यूज नेटवर्क -
गेल्या काही दिवसापूर्वी नागठाणे येथील बिबट्याच्या हल्ल्यात कागल येथील मेंढपाळाच्या 27 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या, मेंढपाळ कुटुंबावर आलेल्या दुखाच्या डोंगरावर मात करण्यासाठी मेंढपाळ बांधवांना हातभार लावण्यासाठी त्यांच्या मेंढपाळ वाड्यावर जाऊन त्यांना धीर आणि आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.


समाज बांधवांनी मेंढपाळ वाड्यावर जात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विधायक रीतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी समाजातील दानशूर व्यक्ती ठाण्याचे सवदे काका आणि मुंबई ची टीम यांनी एक लाख रुपये देऊन मेंढपाळांचा सन्मान केला,तसेच सर्व सहकाऱ्यांनी साडीचोळी ,किराणा माल असे एक महिन्याचा शीधा देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा छोटासा प्रयत्न केला.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याशी प्रो.अजित येडगे साहेबांनी संपर्क करून दिल्यानंतर पडळकर साहेबांनी मेंढपाळांना धीर देऊन मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले,तसेच सवदे काका आणि मुंबई च्या टीम चे अभिनंदन करून कौतुक केले आणि  शासकीय स्तरावर पाठपुरावा करून लवकरच त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी माजी चीफ इंजिनियर शहाजी काका सवदे, सौ रेखा मावशी सवदे, समाजसेवक बजरंग जी गावडे, मा.नामदेव जी मदने सर,प्रो.अजित जी येडगे, डॉ अमोल जी हिरवे, डॉ. सुमित जी गावडे, विद्या तामखडे आणि सहकारी इ. उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम