Hot Posts

6/recent/ticker-posts

#Morochi ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलच्या ओमराज हगारेची क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी

गोळाफेक स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -

सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व माळशिरस तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, अकलूज येथील क्रीडांगणावर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल, मोरोची येथील विद्यार्थी ओमराज संतोष हगारे याने १७ वर्ष  गटातील गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. या यशाच्या जोरावर त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ओमराजने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर मिळवलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय निटवे व सचिव डॉ. योगिता निटवे यांनी त्याचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण पाटील, उपमुख्याध्यापक श्री. जिलानी आतार, वरिष्ठ समन्वयक व क्रीडा विभाग प्रमुख  श्री. समीर पठाण आणि क्रीडा शिक्षक श्री. सुभाष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओमराजने हे यश संपादन केले.

विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने व व्यवस्थापन समितीकडून त्याचे कौतुक करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेतही ओमराजने उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक वाढवावा, अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

ओमराजच्या यशामुळे ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments