#Pune पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे समाजातील योगदान आणि पुरोगामी शासन आजही लोकांसाठी प्रेरणादायी - आ. शेखर निकम


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
पुणे येथे अहिल्यादेवी होळकर समाज सेवा संघ, येरवडा, पुणे यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती चिपळूण सगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी झाली.


मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा-दाही,
तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता,
कारण उत्तम शासन, तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता.

आमदार शेखर निकम यांनी अहिल्या राजमाता यांच्या विषयी बोलताना सांगितले की, अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले. त्यांनी महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी केंद्रे स्थापन केली, त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन दिले, विधवांची स्थिती सुधारण्यात मदत केली, धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिले आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता. अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. अहिल्यादेवी होळकर यांचे समाजातील योगदान आणि त्यांचे पुरोगामी शासन आजही लोकांना प्रेरणा देत आहे. अहिल्याबाईंच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतीला वंदन करून या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
त्याप्रमाणे मा. आमदार शेखरजी यांनी येथील उपस्थित लोकांशी संवाद साधला केलेल्या विकास कामाचा आढावा घेतला. आ. शेखर निकम यांनी कोकणातील धनगर समाजाच्या प्रगतीसाठी त्यांच्या समस्यांचे सातत्याने निराकरण केले आहे. दुर्गम भागात राहण्यात येणारे धनगर बांधवांसाठी रस्ते,पाणी ,वीज इ. सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या
व उर्वरीत कामे पुढील काळात टप्या-टप्याने पुर्ण करु असा ग्रामस्थांना विश्वास दिला तसेच चिपळूण संगमेश्वर तालुक्यातील पुणे येथे कामानिमित्त स्थायीक झालेल्या ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांना या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उपस्थित राहील्याबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले.

यावेळी नगरसेविका पुणे म.न पा. सौ. श्वेताताई चव्हाण,भागोजी शिंदे,युवा उद्योजक दिपक आखाडे,अशोक ढेबे,नरेश हिरवे ,सुरेश वरक, सेवा संघाचे आयोजक अध्यक्ष अशोक बुरटे,  उपाध्यक्ष संदिप गोरे,उपाध्यक्ष संतोष वरक, सरचिटणीस नरेंद्र गोरे,  दीपक गोरे,  कार्याध्यक्ष रामचंद्र बर्गे, संतोष बावदाने , खजिनदार सचिन शिंगाडे, गणपत शेळके, पांडुरंग झोरे, अंकुश गोरे, पत्रकार विलास गुरव,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण येडगे, महिला मंडळाच्या सौ. मनीषा शेळके, ज्योती कोकरे, भारती खरात, मनीषा बावदाने, अश्विनी गोरे, लक्ष्मीबाई माने, ललिता ढेबे,सुनिता आखाडे,वर्षा आखाडे,शांताबाई गोरे,वनिता गोरे,वनिता शेळके,सुरेखा  खरात, शालिनी वरक आणि अलका आखाडे चिपळूण- संगमेश्वर तालुक्यातील पुणे येथे कामानिमित्त स्थायीक झालेले ग्रामस्थ प्रचंड संख्येत उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम