Hot Posts

6/recent/ticker-posts

#Morochi ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘जागतिक वसुंधरा दिवस’ उत्साहात साजरा


पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या प्रतिज्ञेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

महादरबार न्यूज नेटवर्क -

मोरोची (ता. माळशिरस) येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये २२ एप्रिल ‘जागतिक वसुंधरा दिवस’ (World Earth Day) अत्यंत उत्साहात व पर्यावरणप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षी २२ एप्रिल रोजी साजरा होणारा हा जागतिक उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या धोरणकर्ते, कार्यकर्ते आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या उद्दिष्टांचा गौरव करण्यासाठी ओळखला जातो. या पार्श्वभूमीवर शाळेत विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या वतीने आयोजित ‘पृथ्वी संवर्धन प्रतिज्ञा’ कार्यक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येऊन पृथ्वीचे संरक्षण करण्याची शपथ घेऊन झाली. “पाणी वाचवा, झाडे लावा, प्लास्टिक टाळा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

विद्यार्थ्यांनी चित्रकला, पोस्टर सादरीकरण, भाषणे यांद्वारे पर्यावरणप्रेम व्यक्त करत समाजात जागरूकतेचा प्रभावी संदेश दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली.

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण पाटील यांनी प्रभावी संदेश देताना सांगितले,

“पृथ्वी ही आपली आई आहे. तिचे रक्षण करणे ही केवळ जबाबदारी नसून आपले कर्तव्य आहे.”

तसेच वरिष्ठ समन्वयक समीर पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले,

“प्रत्येक विद्यार्थ्याने आजपासून छोट्या सवयी बदलून पर्यावरण वाचविण्याचा संकल्प करावा. आजची पिढी जागरूक झाली तरच उद्याचे भविष्य सुरक्षित राहील.”

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय निटवे व सचिव योगिता निटवे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा पवार यांनी केले. शिक्षकवृंदाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Post a Comment

0 Comments