महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते शहर आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून विस्कळीत झालेल्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक आणि व्यापारी त्रस्त झाले आहेत. या प्रश्नावर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अक्षय भांड यांनी आपल्या तरुण सहकाऱ्यांसह अकलूज येथील महावितरण विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांना सविस्तर निवेदन देऊन प्रशासनाला धारेवर धरले. "येत्या ४८ तासांत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास नातेपुते महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू," असा आक्रमक इशारा यावेळी देण्यात आला.सध्या उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड असून पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून अघोषित भारनियमन केले जात असल्याने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. नातेपुते हे परिसरातील व्यापाराचे मुख्य केंद्र आहे, मात्र तासन् तास वीज खंडित राहत असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
याकडे स्थानिक वीज वितरण विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेची चौकशी करा"महावितरण जेव्हा वीज बिल वसुलीची मोहीम राबवते, तेव्हा त्यांची यंत्रणा अत्यंत कार्यक्षम असते. मात्र, दर्जेदार वीज पुरवठा देण्याची वेळ येते तेव्हा तांत्रिक अडचणींचे कारण देऊन हात झटकले जातात," असे अक्षय भांड यांनी निवेदनात म्हटले आहे. मेंटेनन्सच्या नावाखाली दररोज वीज बंद ठेवली जाते, तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा बिघाड का होतो? या सर्व तांत्रिक कामांची आणि झालेल्या खर्चाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.'ठिय्या' आणि 'टाळे ठोक' आंदोलनाचा पवित्रानातेपुते उपविभागाची जबाबदारी असलेले अधिकारी आपल्या कर्तव्यात अपयशी ठरल्याचा रोष नागरिकांमध्ये आहे.
जर पुढील ४८ तासांत परिस्थिती सुधारली नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू झाली नाही, तर नातेपुते येथील समस्त नागरिक आणि तरुण महावितरण कार्यालयावर 'ठिय्या आंदोलन' करतील आणि कार्यालयाला टाळे ठोकतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कायदेशीर संघर्षाला सर्वस्वी महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.यावेळीयुवक काँग्रेस सोलापूर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष अक्षय भांड,अक्षय ठोंबरे,अजित पांढरे,शुभम सोरटे,पंकज जाधव हे उपस्थित होते
0 Comments