Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun माखजन चे सरपंच महेश बाष्टे यांना 'आदर्श ग्रामरत्न' सरपंच पुरस्काराने सन्मान


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

संगमेश्वर तालुक्यातील माखजन ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री महेश सुरेश बाष्टे आदर्श ग्रामरत्न सरपंच गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माखजन गावामध्ये भरीव काम करत गावाचे रुपडं पालंटल्याने, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

अखिल भारतीय सरपंच परिषद आणि जयंत पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच महाबळेश्वर पाचगणी येथे संपन्न झाला.

अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने प्रत्येक वर्षी ज्या सरपंचानी गाव खेड्यासाठी उल्लेखनीय कार्य केले असेल अशा संपूर्ण महाराष्ट्रातून सरपंचांना आमंत्रित करुन त्यांचा ग्रामरत्न पुरस्काराने देऊन सत्कार व सन्मान केला जातो.या वर्षी संगमेश्वर तालुक्यातील महेश बाष्टे यांच्या अभिनव उपक्रम आणि ग्रामीण भागातील गावखेडी आणि ग्रामस्थांबद्दल असलेल्या प्रेमापोटी केलेल्या ग्रामविकासाचा समाजसेवेचा गौरव म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जयंत सर्जेराव पाटील यांनी दिली.

या प्रसंगी महेश बाष्टे यांना जयंत पाटील व व्यासपीठा वरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित चिन्ह,शाल व मोत्याची माळ देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठार जयंत पाटील, मुंबई पश्र्चिम आमदार तुकाराम हुकुराम , पुणे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे, जेष्ठ व्याख्याते प्रदिप पांगरकर उपस्थित होते.

महेश बाष्टे यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल उपसरपंच सौ पूजा डेरे,ग्रामसेवक प्रशांत रणखांब आदिंसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आणि परिसरातातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments