महादरबार न्यूज नेटवर्क -
कण्हेर येथे शेतकरी आणि महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या दुहेरी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेतकरी बांधवांसाठी जनहित जागर मेळावा आणि महिलांसाठी होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा या कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
हा उपक्रम शिवप्रसाद उद्योग समूह यांच्या वतीने पार पडला. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून शिवप्रसाद सेंटरचे चालक राहुल माने, नामदेव माने, उद्धव माने, अजित पवार, बाळासाहेब गोसावी आणि बंडू माने यांनी यशस्वीपणे नियोजनाची धुरा सांभाळली
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री शरद बापू मोरे उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दुग्ध व्यवसाय मजबूत करण्यावर भर दिला. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेती, दुग्ध व्यवसाय आणि आर्थिक सक्षमीकरण याबाबत माहिती देण्यात आली. दुसरीकडे महिलांसाठी आयोजित “खेळ पैठणीचा” या स्पर्धात्मक कार्यक्रमाने उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
शिवप्रसाद उद्योग समूहाच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना आधार देत दुग्ध व्यवसाय बळकट करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर महिलांना मनोरंजन आणि स्पर्धांच्या माध्यमातून आर्थिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्नही सातत्याने केला जात आहे.
यावेळी बाळासाहेब सरगर, रमेश पाटील, संभाजी माने, तात्यासो माने, आदिनाथ पाटील, अशोक ठवरे, पोपट माने, बाजीराव माने, नितीन पाटील हे मान्यवर तसेच ग्रामस्थ महिला पुरुष उपस्थित होते
0 Comments