Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची सह्याद्री शिक्षण संस्थेला भेट; संस्थेच्या कार्याचा घेतला आढावा


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

 राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी चिपळूण येथील महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या सह्याद्री शिक्षण संस्थेला भेट देऊन संस्थेच्या विविध उपक्रमांची आणि प्रगतीची माहिती घेतली. यावेळी आमदार शेखर निकम यांनी त्यांचे स्वागत केले.

भेटीची सुरुवात स्वर्गीय गोविंदराव निकम स्मृतीस्थळाला भेट देऊन झाली. यावेळी सरनाईक यांनी गोविंदराव निकम यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच परिसरातील शंकर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

यानंतर त्यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेला भेट देत संस्थेच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि विकासात्मक कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत चर्चा केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, बांधकाम समिती सभापती कपिल शिर्के, राकेश शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सह्याद्री शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत संस्थेच्या प्रगतीबद्दल प्रताप सरनाईक यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही संस्थेने शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments