कृषी विज्ञान केंद्र मोहोळ कडून शेतकऱ्यांना महत्त्वाचे सल्ले
महादरबार न्यूज नेटवर्क -
'खेत बचाओ अभियान' अंतर्गत मौजे तांबोळे (ता. मोहोळ) येथे शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १ ते ३० जून २०२६ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या अभियानांतर्गत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात डॉ. स्वाती कदम शास्त्रज्ञ (कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ) अल निनो च्या अनुषंगाने करावयाच्या उपायोजना मातीचे आरोग्य सुधारणे आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी शेतीतील निविष्ठांचा योग्य वापर, हिरवळीच्या खतांचा वापर आणि एकात्मिक पोषण व्यवस्थापन (INM) याविषयी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली. तसेच माती परीक्षण करून संतुलित खत वापराबाबत जागृती निर्माण केली.डॉ. पंकज मडावी यांनी संतुलित व हिरवळीच्या खतांच्या वापराचे महत्त्व पटवून दिले, तर श्री. दिनेश क्षीरसागर यांनी कृषि प्रक्रिया व मूल्यवर्धन संकल्पना, प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याविषयी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी उद्योजक व्हावे या बद्दल शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांची क्षमता वाढवण्यावर भर दिला.
या प्रसंगी पेनुर मंडळ कृषी अधिकारी श्री. सुहास कोळगे, उपकृषी अधिकारी श्री. सुनील चोपडे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. भारत सुरवसे, श्री सुहास ढवळे,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सौ.प्रेरणा कोकाटे कृषी सखी, आजी-माजी सरपंच, शेतकरी उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी, शेतकरी स्वयंसहाय्यता गट आणि परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments