महादरबार न्यूज नेटवर्क -
मौजे भांबुर्डी तालुका माळशिरस या गावचा रहिवासी असणारा गरीब कुटुंबातील महेश अंकुश केंगार यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मात करीत महेशने एमबीबीएस .ची पदवी खडतर प्रवास करून मिळवली. त्याबद्दल त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. डॉक्टर महेश केंगार यांच्या या यशामुळे भांबुर्डी गावामध्ये तरुण पिढी समोर त्यांनी एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
कष्टाला जिद्दीची गोड याप्रमाणे महेशची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांचे वडील अंकुश केंगार व आई सुरेखा केंगार हे दोघेही मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घरात अठराविश्व दारिद्र्य असतानाही महेशने अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांनी मिळवलेले हे यश समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांनी एम बी बी एस ही पदवी प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. त्यांच्या या यशामध्ये आईचे आजोबा दिलीप जावीर व आजी संजाबाई जावीर आणी डॉ.महेश यांचे भाऊ पंकज जावीर यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे.
आज माझ्या निकालानंतर समाजातील सर्वजण एकत्रित आलात आणि माझ्या यशात सहभागी झालात याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.
मी डॉक्टर म्हणून आपल्या लोकांची ज्या पद्धतीने मदत करता येईल त्यापरीने जिथं कुठं माझी गरज भासेल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करेल.
आयुष्यात खूप सारे सत्कार स्वीकारले, खूप सारे कौतुक झाले परंतु
आज मिरवणुकीत माझ्या समाजातील तुम्हा सर्वांना एकत्र पाहून खरच
या सत्काराचा आनंद खूप मोठा होता. मला ज्यांनी ज्यांनी शिक्षणासाठी मदत केली त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो.
0 Comments