Hot Posts

6/recent/ticker-posts

#Pune सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांचा सेवानिवृत्त निमित्त सत्कार सोहळा


महादरबार न्युज नेटवर्क -

कोथरुड,पुणे येथे पुणे महानगर पालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वावरे यांच्या सेवानिवृत्त निमित्ताने सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.मान्यवरांचे हस्ते ट्राॅफी,बुके,शाल देवून सन्मान करण्यात आला.

प्रदिर्घ अशा २८ वर्ष आरोग्य खात्यामध्ये सेवा देऊन सेवानिवृत्त झाले. त्यांनी कोविड काळामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करून हजारो रुग्णांचे देवदूत बनले. तसेंच आरोग्य विभागासाठी त्यांनी नवनवीन योजना अमलात आणून विभागाची ओळख बनले.

या प्रसंगी आरोग्य खात्याचे प्रशासकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुनील आंधळे,वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद खेडेकर, डॉ.सूर्यकांत देवकर, डॉ.संतोष मुळे,डॉ. दीपक पखाले,आरोग्य विभागाचे अधिकारी राहुल वडगाये,धनंजय यरगट्टीकर,गोविंद बादम,पुरुषोत्तम चाटे, आरोग्य विभागाचे कर्मचारी समीर लोंढे,सुधीर पाटील,आशिष तनपुरे,नितीन शिंदे,रमेश धाडवड,राहुल सर्जेराव,आदित्य मुळे,मयूर मांडवकर हे कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments