Hot Posts

6/recent/ticker-posts

#Morochi श्रीराम कृषी महाविदयालयाच्या कृषीकन्या नी शेतकऱ्यांना शेतीविषयक मोबाईल ॲपबाबत केले मार्गदर्शन


महादरबार न्यूज नेटवर्क -

माळशिरस तालुक्यातील मोरोची येथे फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चतुर्थ महात्मा फुले श्रीराम कृषी महाविदयालय पानीव येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्याकडून ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयक मोबाईल ॲपबाबत मार्गदर्शन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाच्या वतीने येथे कृषी कार्यानुभव कार्यक्रम पुढील तीन महिने राबविण्यात येत आहे.त्या अंतर्गत कृषीकन्यानी गावातील शेतकरी बांधवांनाआधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व शेती अधिक फायदेशीर करण्यासाठी गावातील शेतकरी बांधवांना विविध कृषी मोबाईल अॅप्सबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मोबाईल अॅप्स डाउनलोड करणे, नोंदणी करणे व त्यांचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या कृषीविषयक अॅप्सद्वारे हवामान अंदाज, बाजारभाव, कीड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन तसेच विविध शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध होती असे सांगितले.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना महाविस्तार एआय, कृषिक आणि इतर कृषी अॅप्सची माहिती देण्यात आली. या अॅप्समधील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित सुविधा, बाजारभाव, हवामान अंदाज आणि पिक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये अप डाउनलोड करून त्याचा नियमित वापर करावा, असे आवाहन

करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी अॅप वापराबाबत विविध प्रश्न विचारले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणे, खर्च कमी करणे आणि शेती अधिक सक्षम बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे कृषीकन्यानी स्पष्ट केले.

या वेळी श्रीराम कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्या वैष्णवी चव्हाण, श्रुती बाबर,पूजा दुपडे, आकांक्षा म्हेत्रे, आकांक्षा बाबर, तेजस्विनी गायकवाड, नुपूर महारनवर उपस्थित होत्या.

या कार्यक्रमासाठी कमलकिशोर वावरे ,आप्पासो सुळ, औदुंबर पाटील, अखिल सुळ यासोबतच इतर शेतकरी बंधू आणि भगिनी उपस्थित होते.आम्ही तुमच्यासोबत आहोत,या गावात तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही असा विश्वास कृषीकन्या ना दिला.

या कार्यक्रम दरम्यान श्रीराम कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सूरजकुमार राऊत यांचे कृषीकन्या ना मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments